Only Two Officers In Nine Branches Of Gadhinglaj Irrigation Department Kolhapur Marathi News
Only Two Officers In Nine Branches Of Gadhinglaj Irrigation Department Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पाटबंधारे विभागातील नऊ शाखांत दोनच अधिकारी

अजित माद्याळे

गडहिंग्लज : पाणीदार तालुके म्हणून ओळख असणाऱ्या गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात साठलेल्या पाणी नियोजनाला वाली कोण, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. पाटबंधारे व लघु पाटबंधारे विभागाकडील महत्वपूर्ण असलेल्या शाखा अभियंत्यांचीच पदे रिक्त असल्याने नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. तीन्ही तालुक्‍यातील 9 शाखांसाठी दोन अधिकारी कार्यरत आहेत. पदांच्या अतिरिक्त भाराने हे अधिकारीही वैतागले आहेत. 

आजऱ्यातील चित्री, चंदगडमधील घटप्रभा आणि जंगमहट्टी या तीन मध्यम प्रकल्पांसह छोटे-मोठे लघु पाटबंधारे तलावांची संख्या वीसहून अधिक आहे. पाणीदार तालुके म्हणून या उपविभागाची ओळख आहे. पाटबंधारे व लघु पाटबंधारे विभागाकडून साठलेल्या पाण्याचे नियोजन करून शेती व पिण्यासाठी पाणी दिले जाते. तीन्ही तालुक्‍यात नऊ शाखा अस्तित्वात आहेत.

प्रत्येक शाखेला शाखा अभियंत्याचे पद आहे. त्यांच्याकडे प्रकल्पातील पाणी नियोजनासह वसूली, पाणी परवान्यांचे प्रस्ताव, सिंचन व्यवस्थापन आणि देखभाल दुरूस्तीसारखी महत्वाची कामे असतात. परंतु, या पदांचीच वानवा असल्याने अस्तित्वातील शाखा अभियंत्यांकडे इतर शाखांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने ते या भाराने दबलेले आहेत. लघु पाटबंधारे शाखा अभियंत्यांकडे तलावांचे कामकाज येते. तीन्ही तालुक्‍यातील या शाखांकडे आधीपासूनच पद रिक्त आहेत. यामुळे ही कामेही उपलब्ध शाखा अभियंता किंवा कालवा निरीक्षक, मोजणीदारांकडे दिले जाते. 

गडहिंग्लजला हिरण्यकेशी पाटबंधारे आणि लघु पाटबंधारे अशा दोन शाखा आहेत. येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता तुषार पोवार यांची चंदगडमधील तुर्केवाडी शाखेकडे बदली झाली आहे. आजरा पाटबंधारे, लघु पाटबंधारे आणि आंबेओहोळ-सर्फनाला प्रकल्प अशा तीन शाखा असून तेथे एन. डी. मळगेकर एकमेव अधिकारी आहेत.

चंदगडमधील घटप्रभा -अडकूर, तुर्केवाडी, लघु पाटबंधारे क्रमांक 1 व 2 अशा चार शाखा असून तालुक्‍यात आता श्री. पोवार एकमेव शाखा अभियंता आहेत. त्यांच्याकडे हिरण्यकेशीसह अडकूरचाही कार्यभार आहे. म्हणजेच नऊ शाखांमागे केवळ दोन शाखा अभियंता कार्यरत असून त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. सर्व कामांकडे लक्ष देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कामावर परिणाम होत असल्याने अधिकाऱ्यांकडे अधिकाधिक पदांचा कार्यभार नसावा हे शासनच सांगते. परंतु, येथे मात्र त्याच्या उलटेच चित्र आहे. 

उपअभियंताही सेवानिवृत्त 
चंदगडचे उपअभियंता म्हणून बी. एम. पाटोळे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे गडहिंग्लजचाही अतिरिक्त कार्यभार आहे. ते 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे एकाचवेळी दोन महत्वाची पदे रिक्त होणार आहेत. यामुळे या पदाचा कार्यभार दुसऱ्याकडे देण्याऐवजी स्वतंत्र अधिकारी द्यावा अशी मागणी आहे. शाखा अभियंता दोघे आणि मुख्य पदे रिक्त होणार असल्याने पाण्याचे नियोजन कसे होणार, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला कोण जबाबदार? अशी विचारणा होत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT