Out of 540 agricultural pump holders about 200 agricultural pumps electricity meters for the last one and a half years 
कोल्हापूर

दीड वर्षांपासून ५४०  कृषी पंपधारकांपैकी सुमारे पावणे दोनशे कृषीपंप विनामीटरच

सुनील. स. पाटील

वडणगे (कोल्हापूर) : येथील ५४०  कृषी पंपधारकांपैकी सुमारे पावणे दोनशे कृषीपंप हे दीड वर्षांपासून विना वीजमीटर आहेत. २०१९ आणि यावर्षीच्या महापुरामुळे नदीकाठच्या सर्व शेतीपंपाच्या वीजमीटरमध्ये पुराचे पाणी गेले होते यामुळे अनेक वीजमीटर खराब झाली. मात्र,अद्याप ती बदलण्यात आलेली नाहीत.विजेचा वापर कमी असताना सरासरी वीज बिले देण्यात येत आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दड बसत आहे त्यामुळे तातडीने मीटर बदलण्याची मागणी होत आहे.


ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या कृषीपंपधारकांची मीटर पाण्यात बुडाली. यावर्षी आलेल्या महापुरानंतर आणखी काही वीजमीटर खराब झाली. सध्या गावातील आठशे कृषीपंपधारकांपैकी सुमारे सव्वा दोनशे कृषीपंपांना मीटरच नाहीत.  संबंधित शेतकऱ्यांनी वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणच्या शाखा कार्यालयात अर्ज केले आहेत. मात्र मीटर उपलब्ध नसल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मागणीच्या तुलनेत कृषीपंपाच्या वीजमीटर चा पुरवठा होत नाही. मीटर उपलब्ध नसल्याने  खराब मीटर बदलण्यात आलेली नाहीत.
- विक्रांत सपाटे, उपकार्यकारी अभियंता,कदमवाडी उपविभाग

पावसाळ्यात कृषीपंप बंद असतात. सध्या थोड्या फार प्रमाणात कृषीपंप सुरू झाले आहेत. वापर  कमी असतानाही सरासरी वीज बिल येत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.
-महादेव पाटील  शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT