The Oximeter In The Hatkanangale Is Faulty Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हातकणंगलेतील ऑक्‍सीमीटर बंद स्थितीत

अतुल मंडपे

हातकणंगले : येथील नागरिकांची कोविडच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू आहे. यासाठी दिलेले बहुतांश ऑक्‍सीमीटर बंद आहेत. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी शासनाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी' संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. शासन आदेशानुसार याअंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान, ऑक्‍सिजन पातळी आणि इतर अनुषंगिक बाबींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार हातकणंगले नगरपंचायतीने एक शिक्षक, आशा वर्कर, दोन अंगणवाडी सेविका, दोन मदतनीस यांच्या नऊ टीम तयार केल्या आहेत. त्या माध्यमातून घरोघरी जाउन तपासणीची मोहीम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक टीमकडे तापमान तपासणीसाठी थर्मल गन आणि ऑक्‍सिजन पातळी तपासणीसाठी ऑक्‍सिमीटर दिले आहेत, मात्र यातील बहुतांश ऑक्‍सिमीटर खराब असल्याचे नगरपंचायतीचे म्हणणे आहे. त्यामुळे काही प्रभागांत ऑक्‍सिमीटरशिवायच तपासण्या केल्या आहेत.

काही प्रभागांत बंद स्थितीतील ऑक्‍सिमीटरनेच तपासण्या केल्या जात असल्याची प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली असता वरूनच खराब उपकरणे आल्याचे सांगितले जात आहे. 

त्यावरच काम चालविण्याच्या सुचना
तपासणीसाठी आलेले अनेक ऑक्‍सिमीटर खराब आहेत. ही बाब नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मात्र वरूनच खराब साहित्य आले असून, जे आहे त्यावरच काम चालवा, असे सांगण्यात येत आहे. 
- एक अंगणवाडी सेविका 

आम्ही बदलून मागितले
तपासणीसाठी आलेले ऑक्‍सिमीटर बहुतांश खराब किंवा बंद आहेत. याबाबत नगराध्यक्षांना विचारले असता वरूनच तसे आले आहेत. आम्ही बदलून मागितले आहेत, असे उत्तर मिळाले. 
- अमोल कुलकर्णी, नागरिक 

योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे
ऑक्‍सिमीटरबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. याबाबत प्रशासनालाही माहिती दिली आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. 
-गोविंद दरक, 
सदस्य, रुग्ण कल्याण समिती 

उपकरणे बदलून घेण्याबाबत सूचना 
कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑक्‍सिमीटर आले आहेत. यापैकी काही खराब असल्याच्या तक्रारी काही उपकेंद्रातून आल्या आहेत. संबंधितांना ती उपकरणे बदलून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 
-डॉ. योगेश साळे, 
जिल्हा आरोग्य अधिकारी 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT