Police Nike arrested for red handed while accepting bribe kolhapur 
कोल्हापूर

पोलिस ठाण्याच्या आवारातच घेत होता लाच ; वाचा, पुढे काय झाले?

सकाळ वृत्तसेवा

शाहूवाडी (कोल्हापूर) - येथील पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकला लाच घेताला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. धनाजी सराटे ( ४३ ) असे कारवाई झालेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. 

सराटे याला आज लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीस हजार रूपयांची लाच घेताना पोलिस ठाण्याच्या परिसरात रंगेहात पकडले. जमीनीच्या वादातून झालेले मारामारीचे प्रकरण मिटविण्यासाठी त्याने ५० हजार रूपयांची मागणी केली होती.

गिरगांव (ता. शाहूवाडी ) येथील पांडूरंग रामचंद्र कोकरे आणि झोलू लक्ष्मण कोकरे यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यातून त्यांच्यामध्ये मारामारी झाली होती. पोलीस ठाण्यात मारामारीची तक्रार झाली. त्यावेळी मी तुमच्या बाजूने निर्णय देतो म्हणत सराटे याने लाच मागितली. याबाबत जयराम कस्तुरे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. या सापळ्यात सराटे लाच घेताना रंगेहात सापडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT