Kolhapur Police esakal
कोल्हापूर

Kolhapur Police : हेअरस्टाईलवर कात्री फिरवून पोलिसांनी जिरवली मस्ती; रिल्सची खुमखुमी आली अंगलट

फॉलोवर्स वाढविणे, तसेच दहशत निर्माण करण्यासाठी काहींकडून असे प्रकार सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांनी अशांवर कारवाईचे आदेश दिल्याने सर्वच पोलिस ठाण्यांकडून कारवाई करण्यात येत आहे.

कोल्हापूर : भाईगिरी, दादागिरी, फिल्मी स्टाईल्सचे अनुकरण अशातून सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या आव्हानांची खुमखुमी अंगलट येत आहे. पोलिसांनी अशा वादग्रस्त रिल्सची (Reels) थेट दखल घेत संबंधितांना पोलिस ठाण्यात (Police Station) बोलावून समज दिली आहे. आव्हाने देणारे व्हिडिओ काढून टाकण्यासोबतच भाई, दादांनी पोलिसांसमोर लोटांगण घालत माफी मागितली आहे. अनेकांच्या हेअर स्टाईलवरच कात्री फिरवून मस्ती जिरवली आहे.

मोबाईलवर इन्स्टाग्राम, फेसबूक, यू ट्युब, व्हॉटस्‌ अॅप अशा सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून आव्हाने-प्रतिआव्हाने देणारे व्हिडिओ तयार करून व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. फॉलोवर्स वाढविणे, तसेच दहशत निर्माण करण्यासाठी काहींकडून असे प्रकार सुरू आहेत. गुन्हेगारांनीही याचा गैरफायदा घेत गुन्ह्यांचे उदात्तीकरण सुरू केले होते.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांनी अशांवर कारवाईचे आदेश दिल्याने सर्वच पोलिस ठाण्यांकडून कारवाई करण्यात येत आहे. अवैध, बेकायदेशीर कामे करून मिळवलेल्या पैशांच्या जोरावर वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून मिरवणारे मोठ्या संख्येने सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा नावाने दहशत करणाऱ्यांच्या हेअरस्टाईलवर पोलिसांकडून कात्री फिरविण्यात आली आहे.

पन्नासहून अधिक मोबाईल जप्त

कायद्याचे भय नसलेल्यांकडून नियम धाब्यावर बसवून हत्यारांचे प्रदर्शन केले जात आहे. अमली पदार्थांचे सेवन, गांजा, सिगारेट हातात घेऊन अनेक रिल्स बनवल्या जात आहेत. जुने वाद, वर्चस्व दाखविणारे व्हिडिओ सापडताच संबधितांचे मोबाईल जप्त केले जात आहेत. आतापर्यंत पन्नासहून अधिक मोबाईल जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT