Political Argument In Ichalkaranji On The Credit Of Dudhganga Scheme Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

दूधगंगा योजनेच्या श्रेयवादावरून इचलकरंजीत रंगली जुगलबंदी

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा पाणी योजनेच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून येथे आज राजकीय गोंधळ उडाला. आमदार प्रकाश आवाडे यांनी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांचे कौतुक केल्यानंतर पालिकेतील बैठकीत जुगलबंदी रंगली. विशेष म्हणजे या वेळी श्री. चोपडे उपस्थित नव्हते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेत शहर नियंत्रण समितीच्या बैठकीत समारोपवेळी आमदार आवाडे यांनी दूधगंगा योजना मंजुरीचा विषय काढला. या वेळी योजना मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाने अभिनंदन केले. सोबत त्यांनी पाणीपुरवठा सभापती चोपडे यांचेही अभिनंदन केले. चोपडे यांनी परिश्रम घेत या योजनेची उपयुक्त माहिती शासनाला दिल्याचे आवाडे यांनी नमूद केले. मात्र त्यांनी नगरसेवक मदन कारंडे यांचे नाव घेणे टाळले. 

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव यांनी कारंडे यांनीही या योजनेसाठी पाठपुरावा केल्याचे सांगितल्यानंतर जुगलबंदीला सुरुवात झाली. शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी 4 कोटी मंजूर केल्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तुमचा सत्कार केला. पण 107 कोटी आणणारे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांचा सत्कार केला नाही, अशी खोचक टिप्पणी श्री. जाधव यांनी केली. 

श्रेयवादामुळे बैठकीवेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर आमदार आवाडे यांनी कोणीही राजकारण न करता श्रेयवाद थांबवावा व सर्वांचीच ही योजना आहे, असे म्हणून ती मार्गी लावूया, असे आवाहन केल्यानंतर गोंधळ थांबला. तत्पूर्वी, वारणा योजना मार्गी लावण्याच्या विषयावरून कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर व आमदार आवाडे यांच्यातही जुगलबंदी रंगली. तुम्ही ठरवाल तेथून पाणी आणण्याची आपली तयारी आहे, असे त्यांनी या वेळी ठासून सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT