Poor Condition Of Harli-Vairagwadi Road Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

हरळी-वैरागवाडी रस्त्याची चाळण

गणेश बुरुड

महागाव : हरळी खुर्द-वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रस्त्याच्या दुरुस्तीअभावी चाळण झाली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरणासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत लोकप्रतिनिधीकडे ठराव व निवेदन देण्यात आली आहेत, तरीही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा करू, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिला आहे. 

हरळी खुर्द ते वैरागवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर इंचनाळ, हरळी खुर्द व हरळी बु. गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ, संत गजानन महाराज शिक्षण समूह, वैरागवाडी, हासुरवाडी, हासुरसासगिरी, हलकर्णीसह कर्नाटक भागातील ग्रामस्थ करतात. हरळी साखर कारखाना व गडहिंग्लजकडे जाण्यासाठीही या रस्त्याचा वापर होतो. कारखान्याला पूर्व भागातील ऊस याच मार्गावरून जातो. 

रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी हरळी, वैरागवाडी व हासुरवाडी या गावातून संबधित विभागाकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधीकडे ठराव व निवेदन देण्यात आली आहेत. तरीही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

आंदोलन करू
हरळी-वैरागवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निवेदन व ग्रामपंचायतीकडून ठराव देण्यात आले आहेत. तरीसुद्धा या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलन करण्यात येईल. 
- संजय नाईक, अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT