कोल्हापूर

अवघ्या 5 रुपयांच्या नोटेपासून 'प्रवास'; जिगरबाज चहावाल्या बापाची कहाणी

बी. डी चेचर

आर्थिक स्थितीतून कुटुंबाला स्थिरस्थावर करताना नियतीने गंभीर आजारात त्यांचा एक पाय हिसकावून घेतला. तरीही हा माणूस थांबला नाही.

कोल्हापूर : आंबोली (ता. सिंधुदुर्ग) (sindhudurg) येथील चौकुळ गावातील बबन ऊर्फ प्रकाश भिकाजी गावडे जिद्दी माणूस, पाचवीत असताना वर्गात त्यांचा अपमान झाला. शाळेला रामराम ठोकून ते थेट कोल्हापूरला (kolhapur) आले. जगण्याचा संघर्ष तेथून सुरू झाला. चहागाडी व्यवसायातून त्यांनी जगण्याला दिशा दिली. आर्थिक स्थितीतून कुटुंबाला स्थिरस्थावर करताना नियतीने गंभीर आजारात त्यांचा एक पाय हिसकावून घेतला. तरीही हा माणूस थांबला नाही. कुबड्या घेऊन तो आजही चहाचा व्यवसाय करतो आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक मुलगी दत्तक घेऊन तिला आधार दिला आहे. (kolhapur news)

वर्गात अपमानित झाल्याने गावडे यांनी शाळा सोडली. वडिलांना त्यांच्या भविष्याची चिंता होती. शेजारच्या व्यक्तीला त्यांनी मुलाला कोल्हापूरला कामाला पाठवू का?, अशी विचारणा केली. त्याने होकार दिल्यानंतर गावडे कोल्हापूरला आले. पाच रुपयांची नोट घेऊन ते शहरात आले. एका हॉटेलमध्ये कामाला लागले. काही वर्षांनी त्यांनी ढकलगाडी भाड्याने घेऊन चहाची टपरी सुरू केली. कोळशावरचा चहा लोकांत प्रसिद्ध झाला. काही दिवस रस्त्यावर झोपण्याची वेळ त्यांच्या वाट्याला आली. एक दिवस भाड्याची ढकलगाडी सोडली आणि स्वतःची गाडी विकत घेऊन पुन्हा नव्याने व्यवसायाला उभारी दिली.

जिद्दी बाप अन् मुलांचे शिक्षण...

व्यवसायात स्थिरस्थावर होत असताना त्यांचा विवाह झाला. पाचवीत सोडावे लागलेल्या शिक्षणाची मनात खंत होती. त्यामुळे मुलांना उच्चशिक्षित करण्याचा त्यांचा निर्धार होता. मुलगा अमोल पदवीधर झाल्यानंतर आर्मीत भरती झाला. प्रणील इंजिनिअर होऊन टाटा कंपनीत नोकरीस आहे. मुलगी सोनालीसुद्धा पदवीधर झाली. मुलांच्या शिक्षणात त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही असणारी कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी कोल्हापुरात घर खरेदी केले.

जिद्दी दत्तक वडील...

गावडे यांना एका पायाच्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले. एके दिवशी पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. पण, त्यांना माहीत नव्हते की, पाय गुडघ्यापर्यंत काढावा लागेल. त्यातही ते डगमगले नाहीत. पत्नी लक्ष्मी हिच्या मदतीने पुन्हा लक्ष्मीपुरीत चहाच्या व्यवसायात ते रमले. हे करताना पाचगावातील एका होतकरू विद्यार्थिनीला आधाराची गरज असल्याची बातमी त्यांच्या वाचनात आली. तत्काळ तिच्या मदतीला धावून गेले. त्या मुलगीला त्यांनी दत्तक घेतले. तिच्या आर्थिक खर्चाचा भार त्यांनी उचलला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पुजेचा मान मिळणार; 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'चा पुढाकार

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT