pranali kamble sakal
कोल्हापूर

दुखा:तून सावरत वडणगेच्या प्रणालीने केले वडिलांचे स्वप्न साकार

सुनील पाटील

वडणगे (कोल्हापूर) : वडिलांचं आकस्मिक निधन झाले. या दुखा:नं ती खचली नाही. समाजातील दातृत्वाने दिलेल्या उभारीमुळं ती जिद्दीनं शिकली आणि पुण्यातील नामांकित कंपनीत तिची निवड झाली. ही प्रेरणादायी वाटचाल आहे, येथील प्रणाली चंदू कांबळे हिची. दुखा:तून सावरत तिने कष्टाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

येथील चंद्रकांत जगन्नाथ कांबळे हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ग्रामपंचायत सदस्य, शाहू नागरी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. दिवाळीत एका दुकानात खरेदी केल्यावर लकी ड्रॉमध्ये चारचाकी वाहनाचे ते विजेते ठरले. हा सुखद धक्का इतका होता की पुढे काही वेळानेच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तीन वर्षापूर्वीची ही घटना. मात्र, कुटुंबावर कोसळलेल्या अनपेक्षित दुःखानंतर चंदूच्या कुटुंबासाठी वडणगेकर सरसावले. याची माहिती सोशल मीडियावरून पसरल्यानंतर जिल्ह्यातूनही मदत मिळाली. जयकिसान क्रीडा मंडळ, दूध संस्था, शाहू पतसंस्था, ग्रामपंचायत, सेवा संस्था, शिवसाई दूध संस्था, विद्यापीठ हायस्कूल १९९६ बॅच, महालक्ष्मी अन्नछत्र, समीर काळे, अरिहंत जैन फाऊंडेशन, यशवंत दिंडे, ओंकार स्टेज सर्व्हिसेस, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, शिवसाई मंडळ आदींनी मदत निधी दिला.

‘सकाळ'चा पुढाकार

चंदूच्या कुटुंबीयांसाठी ‘सकाळ'ने २५ नोव्हेंबर २०१८ला वृत्त प्रसिद्घ केल्यानंतर तब्बल पाऊणे दोन लाखांचा निधी जमा झाला आणि ही रक्कम ठेव स्वरूपात ठेवली होती. मेडिकल ग्रुपने त्यासाठी पुढाकार घेतला होता.

चंदूच्या कुटुंबीयांसाठी 'सकाळ'चं पाठबळ तर 'डॉ. डी. वाय पाटील’ची सामाजिक बांधिलकी

'डॉ. डी. वाय पाटील’ची सामाजिक बांधिलकी

डॉ. डी. वाय पाटील ट्रस्टने प्रणालीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून पॉलिटेक्निक शिक्षणाची जबाबदारी घेण्याबद्दल सांगितले होते. प्रणालीने मेकॅनिकल शाखेमध्ये प्रवेश घेतला. डिप्लोमात चांगले गुण मिळवले. त्या जोरावर तिला पुण्यातील कंपनीत नोकरी मिळाली. भविष्यात इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करण्याचे प्रणालीचे स्वप्न आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT