Prefer old mobile instead of new one for online education 
कोल्हापूर

ऑनलाईन शिक्षणामुळे 'या' मोबाईलची चलती... 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने बहुतांश शाळांनी ऑनलाईन अध्यापन सुरू केले. मुलांना घरी अभ्यास करता यावा, यासाठी पालकांनी त्यांना मोबाईल घेऊन दिले आहेत. केवळ अभ्यासासाठी उपयोगी येत असल्याने पालक नवीनऐवजी जुन्याच मोबाईलला पसंती देत आहेत. त्यामुळे जुन्या मोबाईलना मागणी वाढली. लॉकडाउनमुळे थंडावलेल्या बाजारपेठेत काहीशी चलती निर्माण झाली आहे. 

जून, जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नवे शैक्षणिक वर्ष उशिराच सुरू होणार आहे; मात्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी ऑनलाईन अध्यापन सुरू केले.  शिक्षक मोबाईलमधील वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतात. लॉकडाउनच्या काळात शिक्षणात खंड पडू नये, शिक्षणासाठी मोबाईल उपयोगात येणार असल्याने त्यांनी जुने मोबाईल घेणे पसंत केले आहेत. अधिक सुविधा आणि मेमरी असणारे मोठ्या स्क्रीनचे जुने मोबाईल कमी किमतीत उपलब्ध आहेत. 

अधिक फिचर असणाऱ्या आणि मेमरी असणाऱ्या जुन्या मोबाईल मॉडेलना पालकांची पसंती आहे. मोठी स्क्रीन असेल तर डोळ्यांना त्रास कमी होईल या मानसिकतेतून ग्राहक मुलांसाठी नव्या मॉडेलचे जुने मोबाईल घेतात. 
- आशुतोष ठाणेकर, मोबाईल दुरुस्ती व विक्री व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT