The problem of electricity will be solved through WhatsApp; a group of one and a half thousand people in Kolhapur district 
कोल्हापूर

विजेचे प्रश्‍न व्हॉटसअपव्दारे सोडविणार ;कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजार जणांचा ग्रुप 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  वीज वितरणातील अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात वीज ग्राहकांचे व्हाटस्‌अप ग्रुप तयार केले आहेत. पुणे विभागात 7350 ग्रुप तयार केले आहेत. यातून 18 लाख वीज ग्राहकांशी संवाद होणार आहे; मात्र याची माहिती बहुतांशी वीज ग्राहकांपर्यंत पोचलेली नाही, परिणामीअनेक वीज ग्राहक या सुविधेबाबत अनभिज्ञ आहेत. 
पुणे विभागात कोल्हापूर परिमंडलाचा समावेश होतो. येथे सुरू केलेल्या या व्हाटस्‌अप ग्रुपमध्ये गल्लीतील, गावात, वाडीवर किंवा रस्त्यावर वीज तारा तुटल्या, शॉर्टसर्किट झाले किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास परिसरातील धोकादायक विजेचे खांब, उघड्या वीज पेट्या, तांत्रिक बिघाड यापासून ते वीज रिडिंग घेण्यासाठी कंत्राटी कामगार आले किंवा नाही, अशा अनेक समस्या व्हाटस्‌अप ग्रुपद्वारे संबंधित महावितरणच्या विभागापर्यंत माहिती वीज ग्राहकांना देता येते, त्यासाठी या ग्रुपचा वापर होणार आहे. 
या परिमंडलात कोल्हापूर व सांगली हे दोन जिल्हे येतात. येथे सर्वच वर्गातील ग्राहकांच्या वीज वितरणविषयक समस्या थेट जाणून घेता याव्यात, यासाठी महावितरणच्या शाखा अभियंत्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांचा व्हाटस्‌अप ग्रुप तयार करण्याच्या सूचना सात महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. बहुतांशी कनिष्ठ अभियंत्यांनी त्याची अंमलबजावणी केली. विशेषतः ग्रामीण भागात याचे काम चांगले झाले. 
शहरी व निमशहरी भागात संबंधित व्हाटस्‌अप ग्रुपमध्ये मोजक्‍याच चार-पाच व्यक्तींचा समावेश आहे. त्या व्यक्तींनी काही माहिती त्या ग्रुपवर टाकली तर त्याचे निराकरण होते, ग्रुपवर असलेल्या व्यक्ती कोण आहेत, हे त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. 
त्यामुळे महावितरणने सुरू केलेली ही नवी संकल्पना ग्राहकांसाठी लाभदायी ठरणार आहे, मात्र महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी याची माहिती ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्‍यक आहे. 

व्हाटस्‌अप आणि ग्राहक असे : 
- कोल्हापूर विभाग- 
1575 व्हाटस्‌अप ग्रुप, यात 3 लाख 93 हजार वीज ग्राहक 
- सांगली विभाग- 1025 व्हाटस्‌अप ग्रुप, यात 2 लाख 56 हजार वीज ग्राहक 
* महावितरण जनमित्राद्वारे हा ग्रुप बनिवण्यात येत आहे. 
* यात सरपंच, ग्रामसेवक, ग्राहक, लघुउद्योजक आदी ग्राहकांचा समावेश.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT