Problems Due To Lack Of Internet In Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

रेशन धान्याची खरेदी दुकानात, ऑनलाईन पावती मात्र मिळते डोंगरात, वाचा चंदगड तालुक्‍यातील अजब प्रकार

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड-आजरा तालुक्‍याच्या सीमेवर भावेवाडी (ता. आजरा) येथील रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहकांना खरेदीची ऑनलाईन पावती करण्यासाठी गाव सोडून डोंगरात जावे लागते. ग्राहकांच्या सोयीनुसार दुकानदाराने जागा निश्‍चित केल्या असून भावेवाडी व धनगरवाड्यावरील ग्राहकांना इब्राहीमपूर (ता. चंदगड) बारीत, तर चितळे येथील ग्राहकांना कासारकांडगावच्या बारीत जावे लागते. गावात इंटरनेट रेंज नसल्याने पाच ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

भावेवाडी येथे शासनमान्य स्वस्त धान्य दुकान असून त्या अंतर्गत चितळे व धनगरवाड्याचा समावेश आहे. दोनशेहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. निर्धारित केलेल्या उत्पन्नावर आधारित यादीनुसार ग्राहकांना धान्याचे वितरण केले जाते. कामामध्ये पारदर्शकता यावी, जलदगतीने उरक व्हावा, नागरिकांचा वेळ वाचावा या हेतूने शासनाने ऑनलाईन कामकाज सक्तीचे केले. त्यासाठी धान्य ुदुकानदारांना इलेक्‍ट्रॉनिक मशिन दिले आहे. त्यावर खरेदी पावती केली जाते.

लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटल्याशिवाय पावती होत नाही; परंतु त्यासाठी भावेवाडी येथे इंटरनेटची रेंजच नाही. ग्राहक येतील तसे त्यांना घेऊन दुकानदाराला बारी (जंगल) गाठावे लागते. जास्त पायपीट होऊ नये म्हणून दुकानदाराने मध्यम मार्ग काढला आहे. भावेवाडी व धनगरवाड्यावरील ग्राहकांसाठी इब्राहीमपूरच्या बारीत, तर चितळ्याच्या ग्राहकांसाठी कासारकांडगावच्या बारीत जाऊन मशिनवर पावत्या केल्या जातात. ही दोन ठिकाणे त्या-त्या गावातील ग्राहकांना जवळ पडतात. तिथून परत दुकानात आल्यावर दोन-तीन किलो धान्य ग्राहकांच्या पदरात पडते.

तंत्रज्ञानामुळे काम सोपे होते हे खरे असले तरी त्याला आवश्‍यक यंत्रणा नसेल, तर तेच काम किती अवघड होते, याचे हे बोलके उदाहरण. तंत्रज्ञान वापरात येण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा जोपर्यंत वाडी-वस्तीपर्यंत उभारली जात नाही तोपर्यंत त्याचे लाभ गावापर्यंत पोचणार नाहीत, हे निश्‍चित. 

दोन टॉवर; पण..... 
भावेवाडी गावानजीक जेऊर व धनगरवाडा येथे दोन मोबाईल टॉवर उभारले आहेत; परंतु अद्याप ते कार्यान्वित नाहीत. कार्यालयीन कामकाज, शिक्षण, खरेदी या सर्वांचा विचार करता हे टॉवर कार्यान्वित झाल्यावरच हा परिसर जगाशी जोडला जाणार आहे.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT