project and design based education research by dr arun patil kolhapur 
कोल्हापूर

 प्रोजेक्‍ट अँड डिझाईन बेस्ड शिक्षण आहे प्रभावशाली; कोल्हापूरच्या डॉक्टरांनी संशोधनात केले सिद्ध 

नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : बदलत्या काळात शिक्षणाच्या पद्धतीही बदलत आहेत. कालानुरूप व सुसंगत अशा शिक्षण पद्धतीचा अवलंब अनेक देश करतात. अभियांत्रिकी क्षेत्रातही अशाच पद्धतीच्या शिक्षणाविषयी संशोधन होत आहे. अभियांत्रिकीच्या बदलत्या शिक्षण पद्धतीत कोल्हापुरातील डॉ. अरुण पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण चार भिंतींच्या आत देण्यापेक्षा प्रोजेक्‍ट अँड डिझाईन बेस्ड शिक्षण हे अधिक प्रभावशाली असल्याचे त्यांनी संशोधनात सिद्ध केले आहे. तसेच नामांकित विद्यापीठातून हे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.

डॉ. पाटील हे कुरकली (ता. कागल) चे. शिवाजी विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स या विषयातून एमएस्सीचे शिक्षण घेतले. सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यायातील १० वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवानंतर त्यांना युनेस्कोने पीएचडीसाठी स्कॉलरशिप प्रदान केली. या स्कॉलरशिपवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मोनॅश विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण नेमक्‍या कोणत्या पद्धतीतून शिकवावे, तसेच ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण पद्धतीतील बदल’ या विषयावर संशोधन केले.

ऑस्ट्रेलियासह एशिया आणि युरोपमधील काही देशांतील अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या विविध विद्यापीठांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम कसा असावा आणि कसा अमलात आणावा, यासाठी विविध देशांत रोल मॉडेल उभे केले आहे.

डॉ. पाटील यांची इतर कामगिरी
 सेंट्रल क्वीन्सलॅंड विद्यापीठाचे डेप्यूटी डीन पदावर काहीकाळ कार्यरत
 ऑस्ट्रेलियातील डिकीन युनिव्हर्सिटीचे पदव्युत्तर विभागप्रमुख
 अमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू पदावर काहीकाळ कार्यरत

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT