कोल्हापूर

आजपासून कोल्हापुरात होणार दस्त नोंदणी

प्रतिनिधी

कोल्हापूरः गेल्या दीड महिन्यापासून खोळंबलेल्या दस्त नोंदणीस उद्यापासून (ता. 11) सुरवात होत आहे. खरेदी-विक्री तसेच तारण दस्ताचेच व्यवहार केवळ नोंदले जातील. 
राज्यभरात ऑनलाईन नोंदणीस मध्यंतरी मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात अशी व्यवस्था नसल्याने दस्त नोंदणीचे काम ठप्प होते. मुद्रांक शुल्कापोटी शासनाला जमा होणाऱ्या महसुलावर याचा परिणाम झाला. लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील 18 दुय्यम निबंधक कार्यालयांतील कामकाज ठप्प होते. उद्यापासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दस्त नोंदणी होत आहे. 
एकावेळी एकाच व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाईल. मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायजरची व्यवस्था केली गेली आहे. शहरात जुने करवीर प्रांत कार्यालय तसेच मध्यवर्ती शासकीय इमारतीत दुय्यम निबंधकांची कार्यालये आहेत. 
यावषी रेडिरेकनरच्या दरात 31 मे पर्यंत स्थगिती दिली गेली आहे. दस्त नोंदणीसाठी शहरी भागात सहा टक्के मुद्रांक शुल्क, नोंदणी एका टक्का शुल्क, एलबीटी या प्रमाणे आकारणी होती. जिल्ह्यातून शासनाला दरवर्षी सुमारे तीनशे कोटींचा महसूल मुद्रांक शुल्कापोटी जातो. लॉकडाउनमुळे दीड महिन्याचा कालावधी वाया गेल्याने महसुलावरही परिणाम होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fake Baba Case : भोंदू अशोक खरात प्रकरण, जप्त बंदुकीचा परवाना नाशिक प्रशासनानेच दिल्याचे उघड, २१ काडतुसे जप्त

IIT Madras Deer Viral Video : IIT मद्रास परिसरातला हृदयस्पर्शी क्षण! हरिणीने रस्त्याच्या मधोमध पाडसाला पाजलं दूध, वाहतूक जागीच थांबली, 18 सेकंदात काय घडलं?

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची मोठी कारवाई

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT