Ajit Pawar Maratha Community esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : 'त्यांच्या धमकीला कोणीही घाबरत नाही'; अजितदादांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही. ही लोकशाही पद्धतीची लढाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

'मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाला कोर्टात न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा त्यांचा विचार दिसत आहे.'

कोल्हापूर : मुंबईत येणाऱ्या आंदोलकांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला. अजित पवार (Ajit Pawar) मराठाद्वेषी आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित करत, त्यांना कायद्याचे ज्ञान शून्य असल्याचा आरोप करण्यात आला.

ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, ‘मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाला कोर्टात न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा त्यांचा विचार दिसत आहे. ईडीची भीती दाखविल्यावर ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. ते काहीही म्हणत असले तरी येत्या २६ जानेवारीला मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकणार आहे. त्यांच्या धमकीला कोणीही घाबरत नाही. मुंबईत गेल्यावर पवार यांची ईडी चौकशी का थांबली, यासाठी ईडीच्या कार्यालयाला आम्ही घेराओ घालणार आहोत.’

वसंतराव मुळीक म्हणाले,‘आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही. ही लोकशाही पद्धतीची लढाई आहे. मराठा समाज कोणत्याही नेत्याला भीक घालणार नाही.’ बाबा पार्टे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्टला आल्यावर सकारात्मक बोलले होते. मुंबईला परतल्यावर मात्र त्यांची विचारसरणी बदलली. त्यांच्याकडून समाजाने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? त्यामुळे आमच्यावर गुन्हे नोंद झाले तरी चालतील. आम्ही मुंबईत धडक देणारच.’ चंद्रकांत पाटील यांनी पवार यांनी मराठा समाजाला धमकी देऊ नये, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT