Radhanagari road likely to be closed 
कोल्हापूर

कोल्हापूर ; देवाळे येथे खचतोय रस्ता; राधानगरी मार्ग बंद होण्याची शक्यता

साईनाथ पाटील

हळदी - कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर देवाळे (ता. करवीर) येथे रस्ता खचून राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंदच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर देवाळे आणि हळदी गावादरम्यान असणाऱ्या छोट्या मोहरीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रखडल्याने तसेच रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या थेट पाईपलाईनच्या कामामुळे संबंधित रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. 

 आज सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने ओढ्यातील पाण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढलेले पाणी रस्त्यावरून पलीकडे  वाहत असताना पाण्याच्या वेगामुळे हळू हळू रस्ता देखील खचला जात आहे. हा रस्ता राज्यमार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आहे. त्यातच अशा पद्धतीने रस्ता खचून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनधारक स्थानिक युवकांच्या मदतीने जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून प्रवास करत आहेत. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाणी जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नाल्याची व्यवस्था केली नसल्याने पिरवाडी, कांडगाव हळदी, कुरुकली या गावांच्या हद्दीतील रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT