कोल्हापूर : निसर्ग चक्रीवादळाबरोबरच जिल्ह्याला दोन दिवस पावसाने चांगलेच झोडपले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच ठिकठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यातच धबधब्यांचे अस्तित्व जाणवू लागले. मात्र, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात असल्याने आणखी किमान महिनाभर तरी वर्षा पर्यटनही "लॉकडाउन' राहणार आहे.
कोरोनाच्या हाहाकारामुळे उन्हाळी पर्यटनाचा हंगाम पूर्णपणे कोरडा गेला. मात्र, लॉकडाउन शिथिल झाले असले तरी आता शाळा सुरू होण्यासाठी आणखी किमान महिना जाणार आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांचे वर्षा पर्यटन तरी करता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली असल्याने हे पर्यटनही शक्य होणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.
अंबाबाई, जोतिबा ही मंदिरे राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. त्याशिवाय पन्हाळा परिसरातही पूर्णपणे शुकशुकाट आहे. केवळ शासकीय कर्मचारी आणि न्यायालयीन कामासाठी येणाऱ्यांची किरकोळ वर्दळ या ठिकाणी आहे. शाहूवाडी परिसराचा विचार केला तर कोरोनाबाधित रुग्णांबाबत हा तालुका हॉटस्पॉट ठरला आहे. मलकापूरपासून पुढे मानोलीपर्यंतच्या मार्गावरील चांदोली परिसराचा अपवाद वगळता प्रत्येक गावात किमान तीन-चार रुग्ण आहेत. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला गेला. गगनबावडा तालुक्यातही साधारणपणे अशीच परिस्थिती आहे.
दरम्यान, राधानगरी-दाजीपूरचा विचार केला तर येथील राऊतवाडी, कासारवाडी हे धबधबे दोन जूनलाच कोसळू लागले आहेत. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असे चित्र या परिसरात अनुभवायला मिळत आहे. मात्र, आणखी किमान काही दिवस पाऊस झाला तरच हे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळणार आहेत.
कधी नव्हे ते पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यात राधानगरी परिसरातील धबधबे कमी प्रमाणात का असेना कोसळू लागले आहेत. मात्र, वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने यंदा त्याचा लगेचच फारसा उपयोग होणार नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाने विशेष खबरदारी घेतली आहे.
- सम्राट केरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.