rare porcupine seen in panhala the rajachi zopadi area 
कोल्हापूर

पन्हाळगडावरील राजाची झोपडी परिसरात झाले दुर्मिळ साळिंदरांचे दर्शन

आनंद जगताप

पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळगडावरील तबकवन उद्यानाशेजारी तटबंदीवर डॉ. राज होळकर यांची आहे राजाची झोपडी. जुन्या झोपडीला लागून त्यांचा नवीन ऐसपैस बंगला. बंगला जरी असला तरी डॉक्‍टर पती-पत्नींना निसर्गाची मोठी आवड. त्यामुळेच त्यांच्या निवासस्थान परिसराला झाडे झुडुपे, रानचिव्यांचा मोठा विळखा.

जवळच सदर इ महलची ऐतिहासिक इमारत, वाघ दरवाजा, दुतोंडी बुरुज आणि त्याखाली वन खात्याच्या तबकवन उद्यानासह लक्ष्मी कुरणात घनदाट झाडी, दगड कपारी. येथे बिबट्यासह रानडुकरे, गवे, साळिंदर, ससे, इजाट, रानकोंबड्या, मोर, लांडोर आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्य. राजाची झोपडी तटबंदीवर असल्याने आणि तिथे माणसांचा वावर फारसा नसल्याने अंधार पडायला सुरू झाला की पशुपक्ष्यांचा वावर झोपडी परिसरात सुरू होतो.

मंगळवारी रात्री आठ वाजताच परिसरात एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क तीन मोठ्या साळिंदरांनी हजेरी लावत तीन तास दर्शन दिले. डॉ. होळकर यांच्या बंगला परिसरात मध्यंतरी बिबट्या आला, डुकरांचा कळप आला. रानमांजर, ईजट यांचा तर नित्याचाच वावर आहे. या प्राण्यांना ते गेटजवळच्या झाडाखाली पाणी, फळे, चपाती आदी खाद्य ठेवत असल्याने ते खाण्यासाठी साळिंदरचे कुटुंब आले आणि त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT