ravikiran ingavle comment on chandrakant patil in kolhapur 
कोल्हापूर

चंद्रकांत दादांनी एकनिष्ठ शिवसैनिकाच्या नादी लागू नये, 'यांनी' दिला इशारा...

युवराज पाटील

कोल्हापूर - विरोधी पक्षात बसावे लागल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी एकनिष्ठ शिवसैनिकाच्या नादी लागू नये. त्यांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याची हिंमत का केली नाही? कोल्हापुरातून पळ काढून कोथरूड मतदारसंघात गेलेले श्री. पाटील म्हणजे वैफल्यग्रस्त भाजपचा काठावर पास झालेला विद्यार्थी आहे, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे.

श्री.पाटील यांनी राम मंदिराबाबत शिवसेनेचे योगदान काय असा प्रश्न केला आहे. बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा भाजप नेते हात वर करून बिळात लपले असताना, बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले. श्री. पाटील यांनी आपला इतिहास तपासावा. जुना भाजप आणि आत्ताचा आयारामांचा भाजप यात जमीनअस्मानाचा फरक आहे. भाजपचे जुने नेते पाठीत वार करणारे नव्हते, प्रामाणिक आणि शब्द पाळणारे होते; पण आजच्या नेत्यांच्या अंगी हे गुण दिसत नाहीत, असा टोलाही  इंगवले यांनी लगावला आहे.

आजच्या नेत्यांच्या वैफल्याने येत्या काळात भाजप रसातळाला गेला तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची अवस्था काय? अशी टीका श्री. पाटील यांनी केली; पण त्यांना सांगू इच्छितो की, निवडणूक आम्ही हरलो; पण त्यास कारणीभूत तुम्ही आणि तुमच्या बगलबच्च्यांनी केलेली गद्दारीच आहे. युती करून सेनेच्या अनेक उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उभे करून पाठीत वार केला. भाजपचा हा डाव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळीच ओळखल्याने आज भाजप सत्तेतून बाहेर आहे, असा टोलाही यात लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा झाले स्वस्त, चांदी मात्र महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Ambabai Temple : अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव, शेकडो वर्षांपासून सुरू असलेला दक्षिणायन किरणोत्सव सोहळा म्हणजे नेमकं काय?

Latest Marathi Breaking News Live: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली, देवभूमीचे लोक पारंपारिक ढोल-ताशांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यास उत्सुक

Kolhapur Pune Train : कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवास होणार तब्बल १ तास कमी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

'ही' मराठी अभिनेत्री होणार शेट्टींची सून ?अहान शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT