Reassuring: District administration's proposal of 700 beds: Planning will be done in ten days 
कोल्हापूर

दिलासादायक ः जिल्हा प्रशासनाचा ७०० बेडचा प्रस्ताव : दहा दिवसात नियोजन होणार

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. यापार्श्‍वभूमीवर 300 अतिदक्षता विभाग आणि 400 नवीन ऑक्‍सिजन बेड व त्यासाठी आवश्‍यक असणारे मुष्यबळही वाढवावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनाकडे केला आहे. वाढवलेल्या बेडसाठी लागणारे मनुष्यबळ हे खासगीमधूनच घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रुग्णांना तात्काळ व वेळेत आरोग्य सेवा मिळेल याचे नियोजन केले आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी करणार असल्याचे शनिवारी सांगितले होते. 
जिल्ह्यात सध्या सीपीआरमध्ये 90 आणि खासगी दवाखान्यात 200 अतिदक्षतेचे बेड आहेत. या बेड संख्येत वाढ केल्याशिवाय कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करता येणार नाही, असे चित्र आहे. जिल्ह्यात दररोज 600 ते 700 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर, प्रतिदिन 15 ते 20 हून अधिक रुग्णांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या प्रस्तावावर शासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. 
सीपीआर, आयजीएम, संजय घोडावत, गडहिंग्लज येथील कोरोना कक्षात ही बेड वाढवण्याचे नियोजन आहे. ही सर्व यंत्रणा खासगी चालकांकडे दिले जाणार आहे. यामुळे ज्या-ज्या ठिकाणी बेड वाढवले जातील त्या ठिकाणी सर्व सोयी सुरळीत आणि वेळेत दिल्या जातील. तसेच, यासाठी लागणारे मनुष्यबळही प्रायव्हेटमधून घेतले जाणार आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर केल्यास निश्‍चितपणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांनाही याचा फायदा होणार आहे. 

जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, संजय घोडावत व गडहिंग्लजसह इतर कोविड सेंटरमधील वाढीव बेडचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. पाच दिवसापूर्वी दिलेल्या प्रस्ताव दिला असून जिल्ह्यातील कोरोना कक्षामधील बेडची संख्या वाढणार आहे. लोकांना इतरत्र जावे लागणार नाही. रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. उपलब्ध असणाऱ्या बेडपैकी अतिदक्षता आणि ऑक्‍सिजन बेड करण्यासाठी प्रस्ताव आहे. खासगी चालकांकडून निविदा मागवली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन नियोजन केले जात आहे. 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी 

जिल्हा प्रशासनाकडून शासनाला दिलेला प्रस्ताव : 
अतिदक्षता विभागातील - 300 बेड 
ऑक्‍सिजनसह -400 बेड 
मनुष्यबळ - प्राव्हेटकडून घेतले जाणार 
या ठिकाणी बेड वाढणार - सीपीआर, आयजीएम, संजय घोडावत विद्यापीठ, पारगाव, गडहिंग्लज 

सध्या अतिदक्षतामध्ये उपलब्ध असणारे बेड : 
सीपीआर -90 
खासगी - 210 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT