Responsible for the supply of remdesivir Information Zilla Parishad Chief Executive Officer Aman Mittal
Responsible for the supply of remdesivir Information Zilla Parishad Chief Executive Officer Aman Mittal 
कोल्हापूर

रेमडेसिविर पुरवठ्याची जबाबदारी अन्न-औषधची  : अमन मित्तल 

सदानंद पाटील

कोल्हापूर: जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्‍शनचा पुरवठा होईल याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. जिल्ह्यात या इंजेक्‍शनचा साठा पुरेसा रहावा ही जबाबदारी याच विभागाची आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. तर शासकीय रुग्णालये, कोवीड काळजी केंद्रे, समर्पित कोवीड आरोग्य केंद्र, जिल्हा कोवीड रुग्णालय यांना रेमडेसिविर इंजेक्‍शन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत असल्याचेही श्री.मित्तल यांनी कळवले आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून कोरोना उपाययोजनांतर्गत गंभीर रुग्णांकरिता रेमडेसिविर इंजेक्‍शन देण्यात येते. सुरुवातीस इंजेक्‍शनचा तुटवडा असल्याने शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना राष्ट्रीय आरोग्य मिशनमार्फत मोफत इंजेक्‍शन देण्यात आली. या विभागाकडून 13 हजार 835 इंजेक्‍शनचे वाटप करण्यात आले आहे. ही इंजेक्‍शन्स बाजारात उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य मिशनकडून केवळ सीपीआर, ग्रामीण रुग्णालय कक्ष, सर्व शासकीय कोवीड सेंटरना इंजेक्‍शनचा पुरवठा सुरु आहे. खाजगी हॉस्पीटलना मिशनमधून इंजेक्‍शन देणे बंद करण्यात आले आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन यंत्रणेच्या सहाय्याने औषधे, वैद्यकीय उपकरणे यांचा पुरवठा सुरळित करणे, जिल्ह्यातील औषधे व उपकरणे, उत्पादन कंपन्यामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी सर्व साठा माहिती घेणे व अधिग्रहित करण्याची जबाबदारी अन्न व औषध विभागावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोपवली आहे. तसेच इंजेक्‍शनचा पुरवठा सुरळीत रहावा व काळाबाजार होवू नये यासाठी विभागीय सह आयुक्‍त , सहाय्यक आयुक्‍त व औषध निरीक्षकांना याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यामुळे खाजगी दवाखान्यांना इंजेक्‍शन पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य मिशन किंवा आरोग्य विभागाची नसल्याचे पत्रक श्री.मित्तल यांनी प्रसिध्दीस दिले आहे.  


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT