Risk Of Corona Infection In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत कोरोना संसर्गाचा धोका

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : परराज्यातून येणाऱ्या नगारिकांमुळे शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. काही दिवसांपासून शहरात आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचा परराज्यातील प्रवासाचा इतिहास असल्याचे प्रशासनाला दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर आता प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. 

जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम कोरोनाचा संसर्ग इचलकरंजीत वाढला होता. त्यानंतर आयजीएम रुग्णालयाला स्वतंत्र कोरोना रुग्णालयाचा दर्जा दिला होता. पालिका प्रशासनानेही कोविड केअर सेंटर सुरू केले होते. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे शहरातील कोरोना संसर्ग लवकर आटोक्‍यात येण्यास मदत झाली. मृतांची संख्या 194 वर महिनाभरापासून स्थिर आहे. त्यामुळे मृत्युदर कमी झाला आहे. 

शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असतानाच काही दिवसांपासून अधूनमधून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांशी रुग्णांचा प्रवासाचा इतिहास असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. परराज्यातून आलेल्या बहुतांशी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्याची वेळ आली आहे. 

आकडेवारी दृष्टिक्षेपात 
एकूण बाधित रुग्ण - 4013 
कोरोनामुक्त रुग्ण - 3810 
एकूण मृत - 194 
ऍक्‍टिव्ह रुग्ण - 9 

सपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT