Rupchand from Andhra gives the taste of paplets 
कोल्हापूर

आंध्रातील रूपचंद देतो पापलेटची चव 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : मासे खाणाऱ्या बहुतांशी खवय्यांना पापलेटची चव प्रिय असते; पण प्रत्येक वेळी हा पापलेट उपलब्ध होतोच असे नाही किंवा परवडतही नाही. अशा खवय्यांसाठी पापलेटची चव देणारा आंध्रातील रुपचंद मासा बाजारात आला आहे. 150 रुपये किलो असा त्याचा दर आहे. त्यामुळे दरही परवडतो. एकच काटा आणि खाण्यास सोपा असणारा रुपचंद कोल्हापूरकरांच्या पसंतीस पडत आहे. 
रुपचंद हा मूळचा खाऱ्या पाण्यातील मासा आहे; पण आंध्र प्रदेशमधील एलूर येथे या माशाची पैदास गोड्या पाण्यात करण्यात येते. त्यामुळे गोड्या पाण्यात वाढणारी रुपचंदची जात विकसित झाली आहे. हा मासा आंध्र प्रदेशबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्रात पाठवला जातो. गोड्या पाण्यातील मासे आवडणाऱ्यांत रुपचंद लोकप्रिय आहेच; पण समुद्रातील मासे खाणाऱ्यांनाही रुपचंदची चव आवडू लागली आहे. रुपचंद मासा हा दीड ते दोन किलो वजनाचा असतो. त्यात एकच काटा असून चव पापलेटसारखी असते. हा मासा हा पूर्वीपासून जिल्ह्यात येतो; मात्र आता त्याची चव येथेही लोकप्रिय झाली आहे. आठवड्याला चार टन मासा येथे विकला जातो. दिवसेंदिवस रुपचंदची मागणी वाढत आहे. 

रुपचंदची वैशिष्ट्ये 
* पापलेटची चव. 
* एकच काटा. 
* एक ते दोन किलोचा मासा. 
* किंमत कमी. 
* गोड्या पाण्यातील मासा. 

 
पूर्वी हा रुपचंद मासा ठराविकच दिवशी यायचा. स्थानिक खवय्यांना त्याची चवही फारशी माहीत नव्हती; मात्र आता सर्वांनाच रुपचंदची चव आवडली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत खपही वाढला आहे. ग्राहक आवर्जुन रुपचंद माशाची मागणी करतात. 
- दयानंद खैरमोडे, मासे विक्रेते. 

रुपचंद माशाची पैदास आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात होते. मिरज, सांगली, इचलकरंजी, कराड, सातारा येथे रुपचंदची विक्री अधिक होते. आठवड्याला 4 टन मासा कोल्हापूर परिसरात खपतो. 
- नामदेव तिकोणे, मासे विक्रेते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT