ruturaj patil speech in kolhapur 
कोल्हापूर

कोरणा योद्ध्यांच्या कार्याला सलाम ; ऋतुराज पाटील  

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी - मार्च महिन्यामध्ये भारतात दाखल झालेल्या व संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना संकटामुळे सर्वांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. अशावेळी जीवाची बाजी लावून कोरोणा विरुद्धच्या लढाईत आपले सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला आपला सलाम आहे.

सध्या जरी कोरोणा पेशंटचे प्रमाण कमी होत असले तरीही तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे दुसरी लाट आल्यास असेच योगदान देण्यासाठी तत्पर असावे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळ शिरगाव येथे स्नेहल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले. या कार्यक्रमांमध्ये आदर्श शिक्षक, उत्कृष्ट पत्रकार,उत्कृष्ट प्रबोधनकार शाहीर व साथीदार, उत्कृष्ट उद्योजक, आदर्श सरपंच उपसरपंच,उत्कृष्ट डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ज्योतिष विशारद व स्नेह लोक फाउंडेशनच्या अध्यक्षा पंडीत मानसी यांच्या संकल्पनेतून हा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, कोजिमाशीचे चेअरमन प्रा. हिंदुराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी गोशिमा चेअरमन श्रीकांत पोतणीस ,उद्योजक अजित आजरी, प्रा. डॉ. स्मिता गिरी, अब्दुल मीरशिकारी ,शैलेंद्र पंडित , निखील प्रभू, पंडित अस्मी, मोहम्मद हसन शेख, प्रशांत भोसले उपस्थित होते . सूत्रसंचालन सुभाष भोसले व प्रास्ताविक आणि आभार प्रा. तुकाराम पाटील यांनी केले.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT