BJP's District President samarjeet ghatge Gesture comment for maharashtra government 
कोल्हापूर

'पक्ष कार्यालयाच्या उदघाटनाला गर्दी चालते शाहू जयंतीस नाही'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पक्ष कार्यालयाच्या उदघाटनाला गर्दी चालते. मात्र राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करण्यास परवानगी नाकारली जाते यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते. ज्यांच्या आदेशावरून परवानगी नाकारली गेली त्यांना शाहू प्रेमी जनता नजीकच्या काळात निश्‍चितपणे ध्यानात ठेवेल. असा टोला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज लगावला. ज्यांनी पुरोगामित्वाचा डांगोरा पिटला त्यांना उशीरा का असेना पण गोमूत्राचे महत्व पटले त्यांनी त्यांच्या नेत्यांनाही धरणावर घेऊन जावे असा सल्ला त्यांनी दिला. (samarjit-singh-ghatge-criticism-on-hasan-mushrif-political-marathi-news)

शाहू सहकारी कारखाना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी टोला लगावला.

घाटगे म्हणाले, शाहू जयंतीच्या आदल्या दिवशी राधानगरी धऱणावर वर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली. पन्नास पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावला गेला. शंभर लोकांच्यावर गुन्हे दाखल केले. कोणाच्या आदेशावरून परवानगी नाकारली हे सर्वाना ठाऊक आहे. नजीकच्या काळात शाहूप्रेमी जनता त्यांना निश्‍चितपणे ध्यानात ठेवेल. जे स्वयंघोषित पुरोगामी होते त्यांना गोमुत्राची आठवण झाली हे बरे झाले. त्यांनीच आपल्या नेत्यांना घेऊन धरणावर घेऊन जावे असा सल्लाही घाटगे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT