Sangli Former Deputy Mayor shekhar Inamdar charge of BJP
Sangli Former Deputy Mayor shekhar Inamdar charge of BJP 
कोल्हापूर

सांगलीचे माजी उपमहापौर इनामदार भाजपचे प्रभारी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाची निवडणुकीसंदर्भातील बैठक आज मुंबईत झाली. बैठकीमध्ये सांगली-मिरज महापालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. 

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गतीने व्यहरचना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सर्वप्रथम निवडणुकीची सर्व सुत्रे माझी खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर सहा सदस्यांची एक समिती बनवण्यात आली. आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शेखर इनामदार यांची प्रभारी म्हणून निवड झाली.

जिल्हा आणि प्रदेश यांच्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने समन्वय ठेवण्याचे काम इनामदार करणार आहेत. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटनमंत्री विजय पुराणीक, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारती, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव हे उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT