fund
fund esakal
कोल्हापूर

सांगली : घाट बांधकामासाठी चार कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा

वाळवा : येथील कोटभागात कृष्णा नदीच्या काठावर पूर संरक्षक भिंत उभारणी आणि घाट बांधकामासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नव्या पद्धतीने ही भिंत उभारताना पर्यटनस्थळ म्हणून हा भाग विकसित होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे, असे ते म्हणाले. श्री. पाटील म्हणाले, ‘‘येथील कोटभागाला प्रत्येक वेळी कृष्णा नदीच्या पुराचा तडाखा बसतो आहे. त्यामुळे सुमारे तीनशे कुटुंबांना दरवेळी विस्थापित व्हावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जयंत पाटील यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करत या कामाला चार कोटी रुपये मंजूर केले आहेत. भिंतीलगत घाट बांधकाम करण्यात येईल. या ठिकाणी याआधी पूर संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र निधीअभावी ते काम थांबले होते. आता नव्याने पूर संरक्षक भिंत बांधताना दहा फूट रुंदीचा रस्ता, त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात येईल. केवळ संरक्षक भिंत न होता तिथे पर्यटन विकास केला जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘कोटभागातील लोकांना पुराचा मोठा त्रास मोठ्या प्रमाणात सोसावा लागला आहे. नव्याने मंजूर झालेल्या पूर संरक्षक भिंतीने पुराचा प्रभाव कमी होईल. या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.’’ यावेळी नेताजी पाटील, जयकर गावडे, जालिंदर थोरात, मिलिंद थोरात, किसन गावडे, महालिंऺग कोरे, संदीप धनवडे, शरद अहिर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT