sanjay mandlik mermaid for hasan mushrif
sanjay mandlik mermaid for hasan mushrif 
कोल्हापूर

मुश्रीफ यांच्याकडून मंडलिकांचा वारसा जतन

सकाळ वृत्तसेवा

कागल : खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जोपासलेला शिवरायांचा विचारांचा वारसा मंत्री हसन मुश्रीफ जोपासत आहेत. सुदैवाने राज्यात शिवाजीराजांच्या विचारांचे राज्य आहे. सोडतीनशे वर्षांचा छत्रपती शिवरायांचा इतिहास शिवगर्जना नाट्यरूपाने आणला जात आहे ही बाब शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे. जगातील असामान्य योद्धा म्हणून शिवरायांकडे पाहिले जाते. शिवाजीराजांचे आरमार व त्यांचे कर्तृत्व राज्याला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. 

हसन मुश्रीफ फाऊंडेशन, कागल नगर परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने शिवगर्जना महानाट्य गेले दोन दिवस येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर झाले. महानाट्याच्या दुसऱ्या दिवसाचे उद्‌घाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. महानाट्य पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या लोक उपस्थित होते. 
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सदाशिवराव मंडलिक व राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या विचारांवर घडलो. दोघांनीही छत्रपती शिवरायांचे विचार जोपासले. तेच विचार आज आणि भविष्यातही जोपासणार आहे. जीवाभावाची माणसं एकत्र आल्यावर काय घडू शकते हे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निमिर्ती करून जगाला दाखवून दिले. त्यांचा जीवनपट शिवगर्जनाच्या रूपाने जनतेसमोर मांडला जात आहे. यातील प्रसंग व राज्याभिषेक सोहळा कलाकारांनी जिवंत केला. या लोकनाटयाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. लोकांचा मी आभारी आहे.'' 

दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक नवीद मुश्रीफ यांनी केले. बंडोपंत चौगुले, पंडितराव केणे, किशाभाऊ किरुळकर, विश्वासराव कुराडे, शहाजी यादव, मनोज फराकटे, संजय हेगडे, नेताजी पाटील, बी. के. डोंगळे, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, कृष्णात पाटील, चंद्रकात गवळी, बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), शशिकांत खोत, नगराध्यक्षा माणिक माळी, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, उपनगराध्यक्ष सतीश घाटगे, प्रवणसिंह भोसले आदींसह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. 

कलाकारांचे कौतुक 
शिवगर्जना महानाट्याच्याच्या रूपाने जनतेला शिवचरित्र समजले. चारशे कलाकारांनी प्रत्येक प्रसंगांत कसदारपणे काम करीत इतिहास उभा केला. स्पेशल लाईट इफेक्‍ट, भव्य रंगमंच व साऊंड सिस्टिममुळे प्रेक्षकांना प्रभावित केले. लोक शिवगर्जनाच्या कलाकारांचे कौतुक केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT