Satej Patil
Satej Patil esakal
कोल्हापूर

Kolhapur : येत्या तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवलं जाण्याची शंका; सतेज पाटलांनी व्यक्त केली भीती

सकाळ डिजिटल टीम

मोबाईलवर संदेश फिरवून तरुणांची माथी भडकवण्याचे काम एक विशिष्ट पक्ष करत आहे. ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, येथे असे काही घडत नाही.

कोल्हापूर : ‘पन्हाळा, जयसिंगपूर येथील घटना, तसेच सोशल मीडियावरून फिरणारे संदेश पाहिल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका आहे,’ असे कॉंग्रेसचे (Congress) विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले.

त्यासाठी लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सोशल मीडियावरील संदेश गंभीरतेने तपासण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासनासोबत बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये (Kolhapur) अशांतता राहावी, असा प्रयत्न सातत्याने होत आहे. मोबाईलवर संदेश फिरवून तरुणांची माथी भडकवण्याचे काम एक विशिष्ट पक्ष करत आहे. ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, येथे असे काही घडत नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पुढे येण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेरोजगारी, महागाई या प्रश्‍नांकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत. त्यातून काही तरी घडण्याची शंका आहे.

यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मोबाईलचे संदेश कुठून येतात, याचा अभ्यास करावा, असे सांगणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशाला समतेचा संदेश दिला आहे. येथे सर्वधर्मसमभावाची परंपरा आहे. शहरात गैरसमज पसरू नयेत. काहीतरी अघटित घटना घडू नयेत यासाठी तरुणांनीही सतर्क राहावे.’

ते पुढे म्हणाले, ‘भाजपचा पराभव हे एकमेव ध्येय ठेवून महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाबाबत दोन-तीन दिवसांत कॉंग्रेस राज्यातील आढावा घेणार आहे. जागा देण्याबाबतच्या विषयावर आता काही बोलणार नाही. राज्याची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की, आमदार फंडाचीही बिले निघत नाहीत. पण आमदारांनी बजेटमध्ये सुचवलेली कामे सोडून इतरांची कामे केली जात आहेत. यातून ४० टक्केचा कर्नाटकी पॅटर्न राबवला जात आहे असे वाटते. पालकमंत्री काम करत नसतील तर कायद्यानुसार जावे लागेल. हक्कभंग हा आमदारांना कायद्याने दिलेला अधिकार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT