shirol taluka 20 percent vaccination completed health marathi news
shirol taluka 20 percent vaccination completed health marathi news 
कोल्हापूर

धक्कादायक! COVID VACCINE मध्ये  शिरोळ तालुका नापास; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली झडती

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : लसीकरणात जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍याची कामगिरी पिछाडीवर आहे. लोक मेल्यानंतर तुम्ही लसीकरण करणार आहात का? कोरोनाने मेल्यानंतर त्यास नगरसेवकाला जबाबदार धरावे का? मते मागण्यासाठी घरोघरी जाता तसे आता लसीकरणासाठी पुढाकार घ्या. शिक्षकांना आदेश काढून त्यांचीही मदत घ्या. पण लसीकरणाचा वेग वाढवा असे सांगत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी प्रशासनाची चांगलीच झाडाझडती केली. 

जिल्हाधिकारी  देसाई शनिवारी शिरोळ तालुक्‍याच्या दौऱ्यावर असताना विविध आरोग्य केंद्रांनाही भेटी दिल्या. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामगिरीमुळे शिरोळ तालुक्‍याचे अपयश झाकून जात असल्याचे सांगून त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांच्या कार्याचे कौतूक केले. तालुक्‍यातील 33 उपकेंद्रे, 7 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णायले असताना केवळ 20 टक्के लसीकरण होणे हि दुर्दैवाची बाब आहे. लसीकरणात तालुका इतका मागे का असा प्रश्‍न करुन नगरसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या. पण लसीकरणाची गती वाढली पाहिजे. 

गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी आजच शिक्षकांना आदेश काढून त्यांची याकामी मदत घ्या असे सांगितले. लॉकडाऊन नको असेल तर काम दिसले पाहिजे. लसीकरण हा पहिल्या टप्प्यातील महत्वाचे काम आहे. यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने काम केलेच पाहिजे. शिरोळ तालुक्‍यातील परिस्थिती खूप वाईट आहे. काहीही करुन लसीकरणाला गती द्या असा सज्जड दमही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला. 

नगराध्यक्षा डॉ. निता माने यांनी खासगी रुग्णालयातही लस उपलब्ध करुन दिल्यास केवळ पन्नास रुपयात देण्याची तयारी दर्शविली. यावेळी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टिना गवळी, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दातार, नगरसेवक शितल गतारे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर, उदगावच्या सरपंच कलिमून नदाफ, ग्रामसेवक रायसिंग वळवी, विजयसिंग रजपूत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील उपस्थित होते. 

स्वॅब तपासणी जयसिंगपुरात 
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जयसिंगपूरमध्ये स्वॅब तपासणी सुरु करा असेही आदेश दिले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दक्ष राहून काम करण्याचे आदेश देताना जयसिंगपूरमध्ये स्वॅब तपासणी केंद्र सुरु करण्याचा महत्वपूर्ण आदेशही दिला. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT