शिवाजी विद्यापीठ 57 वा दीक्षांत समारंभ : राष्ट्रपती, कुलपती 'सुवर्णपदक' मानकऱ्यांची नावे जाहीर

Shivaji university Gold 57th Convocation Ceremony President Gold Medal Chancellor Gold Medal nomination Announced education marathi news
Shivaji university Gold 57th Convocation Ceremony President Gold Medal Chancellor Gold Medal nomination Announced education marathi news

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या 57 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (ता.6) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये राष्ट्रपती सुवर्ण पदक व कुलपती सुवर्णपदक सौरभ संजय पाटील यांना तर कुलपती सुवर्ण पदक महेश्‍वरी धनंजय गोळे यांना जाहीर करण्यात आले. कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी या नावांची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी डॉ.शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन होणार आहे. मंगळवारी (ता.6) सकाळी 10.45 ते दुपारी 12 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने दीक्षांत समारंभ होईल. यासाठी मोजक्‍याच स्नातकांना विद्यापीठातील शाहू सभागृहात बोलावले जाईल. येथे प्रथेप्रमाणे प्रमाणपत्र वाचन व अन्य कार्यक्रम होतील. दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष कुलपती भगतसिंग कोश्‍यारी हे ऑनलाईन समारंभात सहभागी होतील. 

यंदा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमूख पाहुणे असून ते देखील ऑनलाई माध्यमातूनच स्नातकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक विद्याशाखेतील सुवर्णपदक विजेत्या स्नातकाला प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येईल. बाकी सर्व पदवी प्रमाणपत्र पोस्टाने स्नातकांना पाठवले जातील. वाढत्या कोव्हीड साथीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

 यंदाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक भौतिकशास्त्रात विद्यापीठातून एम.एस.सी केलेल्या सौरभ संजय पाटील यांना देण्यात येणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील महेश्‍वरी धनंजय गोळे यांना कुलपती सुवर्णपदक दिले जाणार आहे. युट्युबवर हा समारंभ सर्वांना पाहता येणार आहे. 
या पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक गजानन पळसे, जनसंपर्क अधिकारी डॉ.अलोक जत्राटकर हे उपस्थित होते. 

पदीधरांची संख्या दृष्टीक्षेपात 
पी.एच.डी 
विज्ञान व तंत्रज्ञान - 96 
वाणिज्य व व्यवस्थापन - 10 
मानव्यशास्त्र - 62 
इंटर डिसिप्लिनरी स्टडी - 6 
एकूण - 174 

एम.फील 
विज्ञान व तंत्रज्ञान - 5 
वाणिज्य व व्यवस्थापन - 9 
मानव्यशास्त्र - 22 
इंटर डिसिप्लिनरी स्टडी - 0 
एकूण - 36 

पदव्युत्तर पदवीका (पोस्ट ग्रॅज्युएशन) 
विज्ञान व तंत्रज्ञान - 4038 
वाणिज्य व व्यवस्थापन - 3198 
मानव्यशास्त्र - 2898 
इंटर डिसिप्लिनरी स्टडी - 208 
एकूण - 10342 

पदवी 
विज्ञान व तंत्रज्ञान - 31292 
वाणिज्य व व्यवस्थापन - 18627 
मानव्यशास्त्र - 14642 
इंटर डिसिप्लिनरी स्टडी - 1812 
एकूण - 66373  


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com