Shiv Chhatrapati award will be given to players from Kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खेळाडूंना मिळणार शिवछत्रपती पुरस्काराचा मान...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा करण्यात आली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी वर्चस्व राखले. टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार, जलतरणपटू स्वप्नील पाटील, तर क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अनिल पोवार यांची, तर बेसबॉल खेळाडू गिरिजा बोडेकर यांना हा पुरस्कार २०१८-१९ साठी झाला आहे. २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त सर्वांना गौरविण्यात येणार आहे.

खेलो इंडियातील खेळाडूंचा गौरव

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण आणि गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२० पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेत्यास अनुक्रमे १ लाख, रौप्यपदक विजेत्यास ७५ हजार आणि कास्य पदक विजेत्यास ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

शनिवारी वितरण 

पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी गेटवे येथे सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार विजेत्या खेळाडूंसह यंदाच्या ‘खेलो इंडिया’त पहिल्या क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या पदक विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे सत्कार करण्यात येणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या ४०० च्या घरात असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Wari Accident: जेजुरी अपघातानंतर आरोग्य विभागाची युद्धपातळीवर धाव; मृत वारकऱ्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याची शासनाची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : जून २०२६ मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ४.३८% आहे

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT