

Sachin Tendulkar meets India women's team at Lord's
Sakal
Sachin Tendulkar motivational session at Lord's: लॉर्ड्सवर सध्या भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना सुरू आहे. लॉर्ड्सवर होणारा हा पहिलाच महिला कसोटी सामना असून या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
शेवटच्या दिवशी (सोमवारी, १३ जुलै) भारताला विजयासाठी ४ विकेट्सचीच गरज आहे, तर इंग्लंडला ३२७ धावांची गरज आहे. अशात शेवटच्या दिवशी भारतीय संघाला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) मार्गदर्शन मिळाले आहे.