Shiv Sena leader Arvind Sawant esakal
कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, तीच ही वाघ नखे आहेत का? अरविंद सावंतांचा सवाल

वाघ नख्यांसंदर्भात म्युझियमने जे कळवलेले आहे की आम्ही त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.

सकाळ डिजिटल टीम

''लोकसभेतच सत्तांतर व्हायला हवे होते. तेथे जितका धक्का दिला तितका लागलेला नाही. त्यामुळे आता लोकसभेत नाही, तर विधानसभेत नक्कीच सत्तापालट होईल.''

कोल्हापूर : लोकसभेत (Kolhapur Lok Sabha) धक्का दिला आहे. मात्र, जितका पाहिजे तितका लागलेला नाही. तेथेच सत्तापालट व्हायला हवा होता. लोकसभेत नाही मात्र विधानसभेला नक्की होईल, असे स्पष्ट मत खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी सपत्नीक कोल्हापुरात येऊन करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे (Ambabai Devi) दर्शन घेतले.

राज्यपातळीवरील प्रश्‍नावर खासदार सावंत म्हणाले, ‘लोकसभेतच सत्तांतर व्हायला हवे होते. तेथे जितका धक्का दिला तितका लागलेला नाही. त्यामुळे आता लोकसभेत नाही, तर विधानसभेत नक्कीच सत्तापालट होईल. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणून सर्वजण कामाला लागलेले आहेत.

परिवर्तन नक्की घडणार आहे. तिसरी आघाडी वगैरे भाष्य करून आपण त्यांना मोठं करतोय. ते छोटे आहेत छोटेसेच राहू दे. सध्या विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. तेथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येतील. तसेच वाघ नख्यांसंदर्भात म्युझियमने जे कळवलेले आहे की आम्ही त्याबद्दल अनभिज्ञ आहोत. ती वाघनखे घालून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा काढला, तीच ही वाघ नखे आहेत का? याबद्दल आमच्या मनातही अनिश्चितता आहे.’ खासदार सावंत यांच्यासोबत सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व निवडक पदाधिकारी उपस्थित होते. खासदार सावंत यांनी काही पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

‘त्यांच्या’वर काय कारवाई झाली?

हिट ॲन्‍ड रन प्रकरणांमध्ये कारवाई होईल, असे वाटत नाही. धनाढ्य आणि राजकारण्यांना हा सत्तेचा उन्माद आलेला आहे. जेव्हा एखादा आमदार पोलिसांना शिवीगाळ करतो किंवा थप्पड मारतो, दुसरा आमदार हातपाय तोडा आणि माझ्याकडे या, मी ऑनटेबल जामीन देतो, असे म्हणतो, तिसरा आमदार थेट पोलिस ठाण्यात जाऊन गोळ्या घालतो. त्यांच्यावर काय कारवाई झाली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल या प्रकरणातील चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून निघून गेला

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT