कोल्हापूर

बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू

बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल - बांधकामावर पाणी मारताना झाली दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रंकाळा येथील बांधकामावर पाणी मारत असताना शाळकरी मुलागीचा शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. अंकिता अनिल शेळके ( वय १५ रा. राजेंद्रनगर, सध्या रा. रंकाळा) असे तिचे नाव आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या बाबाबतची फिर्याद महेश ब्रह्मदेव सोनवणे ( वय 35 रा. राजेंद्रनागर ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ ( रा. नागाला पार्क ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली. स्वातंत्र्य दिनीच ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

स्वातंत्र्य दिनीच ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

याबाबत पोलिसांकडून आणि स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी,

की संदीप संकपाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत.रंकाळा स्टँड परिसरात त्यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर नूतन अनिल शेळके या पाणी मारण्याचे काम करतात. बांधकामावरील वायरिंग खराब झाले असल्याची कल्पना त्यांनी संदीप संकपाळ यांना दिली होती. काल सकाळी अंकिता पाणी मारण्यासाठी गेली. तिने मोटारी सुरू करण्यासाठी बटन सुरू केले. यावेळी तिला जोरदार वीजेचा शॉक लागला, या धक्क्याने ती जागीच कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णालायत नेले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान राजेंद्रनगर येथे शेळके कुटुंब अनेक वर्ष राहत होते. तेथे त्यांचा चांगला संपर्क आहे. अनिल शेळके त्यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी नूतन व दोन मुली व एक मुलगा असा त्याचां परिवार काही दिवसांपूर्वी रंकाळा स्टँड येथे बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून काम करत होत्या. काल 15 ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास त्यांची मुलगी अंकिता शेळके हीने मोटार सुरू केली आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला. मात्र त्याकडे कोणीही गांभिर्याने पाहिले नाही.

ही माहिती समजताच तिचे नातेवाईक व राजेंद्रनगर मधील सामाजिक कार्यकर्ते सीपीआर हॉस्पिटल गेले. दुर्देवी घटना घडून बराच वेळ होऊन सुद्धा कोणतीही कारवाई व संबंधित मालकावर गुन्हा नोंद न झाल्याने ते संतप्त झाले. तेथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच शवविच्छेदन विभागासमोर व सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ गर्दी झाली. अखेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

Redbird Flight Training Academy: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट अकॅडमी पुन्हा चर्चेत; पाच वर्षांत अनेक विमान दुर्घटनांची नोंद, AAIB अहवालात धक्कादायक नोंदी!

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

Farmer Drowning: शेतीसाठी पाईप हलवताना काळाचा घाला; वसमत तालुक्यातील शेतकरी बुडून मृत, कालव्याच्या पाण्यात दोरी अडकली अन् अनर्थ घडला!

Mobile Price Hike : शॉकिंग! स्मार्टफोन्सची किंमत होणार डबल; कमी फीचर्स अन् जास्त दर, मोबाईल महागण्याचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT