shripatrao shinde  sakal
कोल्हापूर

गोडसाखर चालवा, मी बाहेर पडतो ; श्रीपतराव शिंदे

श्रीपतराव शिंदे : ‘त्या’ बारा संचालकांना जनता दल बैठकीतून हाक

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : सर्व संचालक एकत्र आले तर अजूनही ५० ते ६० हजार टन उसाचे गाळप होऊ शकते. ‘ते’ १२ संचालक आणि त्यांना राजीनामा देण्यास प्रवृत्त करणाऱ्या‍ महाभागांना मी सांगू इच्छितो, शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र येऊन गोडसाखर कारखाना चालवावा. मी एका मिनिटात कारखान्यातून बाहेर पडतो. तसे जमत नसेल तर खोटी पत्रके प्रसिद्ध करून गैरसमज पसरवणाऱ्यांना तालुक्याची जनता धडा शिकवेल, असा इशाराही गोडसाखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज दिला.

गोडसाखर कारखाना आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज पक्ष कार्यालयात जनता दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी अ‍ॅड. शिंदे बोलत होते.ते म्हणाले, ‘उपाशी लोक अन्याय फार सहन करत नाहीत. दोन-चार पक्ष बदलणाऱ्या प्रकाश चव्हाण यांनी गळीत हंगामाच्या कार्यक्रमात कारखाना सुरु करणाऱ्यांसोबत असल्याचे सांगून शेतकरी व कामगारांना ऊस पाठविण्याचे आवाहन केले. त्याच चव्हाण यांनी चार दिवसांत भूमिका बदलली. त्यामागचे कारण काय? तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा यांनी आगामी निवडणुका धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा होणार आहेत.

महेश कोरी म्हणाले, खासदार आण्णासाहेब जोल्ले कारखान्यासाठी चार कोटींचे अर्थसाहाय्य करणार होते. हे समजल्यानंतर कारखाना सुरळीत चालणार म्हणून सहा संचालकांना आमिष दाखवून फोडले. बापू म्हेत्री, हिंदूराव नौकूडकर, वीणा कापसे यांची भाषणे झाली. अ‍ॅड. नाझ खलिफा यांनी आभार मानले. उदय कदम, राम मजगी, सुभाष देसाई, बाळकृष्ण परीट, शशिकांत चोथे, शकुंतला हातरोटे, अमृत भोसले, काशिनाथ बेळगुद्री, बाळू भैसकर, अनिल कुंभार, बिकनसो बजरू, श्री. इंगवले, केंपाण्णा हुल्लोळी, आदी उपस्थित होते.

श्री. कोरी म्हणाले, ‘मुश्रीफ साहेबांसाठी मते मागताना काय नाकीनऊ आले ते आम्हालाच माहीत. त्यावेळी मुश्रीफ यांनी आमच्या मागे हिमालयासारखे उभे राहण्याची ग्वाही दिली. ते दिवस मी आठवले तर, आता गोडसाखरबाबतच्या घडामोडीत मुश्रीफ यांची भूमिका मला स्वप्नवतच वाटत आहे. अजूनही आमचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. त्यांनी सत्याची बाजू घ्यावी.

रोज दारात जायचे का ?

श्री. शिंदे म्हणाले, ‘बिद्रीचे चेअरमन झाल्यानंतर के. पी आणि गोडसाखर कारखान्याबाबत अ‍ॅड. शिंदे मला एकदाच भेटले, असे भाष्य मंत्र्यांनी केले. म्हणजे रोज त्यांच्या दारात जाऊन आम्ही साष्टांग नमस्कार करायचा का? तिच अपेक्षा असेल तर त्याला लोकशाही म्हणतात का,’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT