The simplest pharmacological process in just seven to eight minutes 
कोल्हापूर

सोप्या पद्धतीने औषधनिर्मिती   केवळ सात ते आठ मिनिटांत प्रक्रिया 

नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : विविध आजारांवरील परिणामकारक औषधांची निर्मिती करताना अनेकवेळा औषध निर्मात्यांना तब्बल 70 ते 80 तासांहून अधिक काळ प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ तसेच किचकटही असते. याला पर्याय शोधत कोल्हापूरच्या डॉ. सविता धोंगडे-देसाई यांनी कमी वेळात सोप्या पद्धतीने औषधनिर्मितीबाबत संशोधन केले आहे.

मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करून त्यांनी संशोधन केलेली प्रक्रिया केवळ सात ते आठ मिनिटांत होते. ही अभिक्रिया कमी वेळात होण्यासाठी त्यांनी नॅनो कॅटेलिस्ट व आयोनिय लिक्विडचा वापर केला आहे. त्यांच्या या संशोधनामुळे क्षयरोग, कर्करोग, रक्‍ताच्या गुठळ्या होणे या व इतर आजारांच्या औषधनिर्मितीची प्रक्रिया सोपी झाली आहे. 

डॉ. धोंगडे-देसाई यांनी केलेल्या या संशोधनाबाबत जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे दोन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यासोबतच औषधनिर्मितीच्या सोप्या प्रक्रियेबाबत त्यांच्या व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनावर आधारित 14 आंतरराष्ट्रीय पुस्तके लॅबर्ड ऍकॅडमी, जर्मनी या नामांकित संस्थेकडून प्रकाशित केली आहेत. डॉ. धोंगडे-देसाई मूळच्या साताराच्या आहेत तर त्यांचे सासर पाचगाव आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमाकांने रसायनशास्त्र विषयात पूर्ण झाले. त्यानंतर त्या देवचंद कॉलेज, निपाणी येथे प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. नोकरी करत असतानाच शिवाजी विद्यापीठात संशोधन सुरू ठेवून पीएच.डी. संपादन केली. त्यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता दिल्यानंतर देवचंद महाविद्यालयात त्यांनी शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली. 

37 शोधनिबंध प्रकाशित 
डॉ. धोंगडे-देसाई सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थी पीएच.डी. करत आहेत. त्या दहा वर्षे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य होत्या. त्यांचे 37 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. हे शोधनिबंध त्यांनी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदांत सादर केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

Blistering Heat : शहरी भागांत उष्णतेच्या झळा तीव्र; ३४ वर्षांत ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT