State Ajinkyapad Kabaddi Competition Lockdown Kolhapur Marathi News
State Ajinkyapad Kabaddi Competition Lockdown Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धा लॉकडाउन 

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येत्या 5 ते 8 मार्चअखेर जळगाव येथे राज्य कुमार-कुमारी गटाच्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धा होणार होत्या. पंरतु, राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सात मार्चअखेर सर्वच क्रीडास्पर्धा आयोजनास बंदी घातली आहे. परिणामी, राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेचे लॉकडाउन निश्‍चित झाले. त्यामुळे ही स्पर्धा होणार नसल्याने कोरोनाच्या प्रकोपातही धोका स्विकारून केलेला खेळाडूंचा जिल्हास्तरावरील खेळ कूचकामी ठरणार आहे. याचा राज्यातील शेकडो खेळाडूंना फटका बसणार आहे. 

मार्च महिन्यात कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून सर्वच क्रीडाक्षेत्र जणू ऑफसिझनमध्ये गेले. मुख्यतः उन्हाळी शिबिरे रद्द झाल्याने नवोदित खेळाडूंच्या श्रीगणेशासह जडणघडणीलाच ब्रेक लागला. जूनपासून अनलॉकमध्ये नियम व अटी पाळत अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी व्यवहार सुरू झाले तरी, त्यात खेळाला ठेंगाच मिळाला. मोठ्या गुंतवणूकीमुळे यंदा आयपीएल क्रिकेट सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेरदुबईत झाली. मात्र, स्थानिक क्रीडाक्षेत्रातील घडामोडी बंदच राहिल्या. नोंव्हेंबरमध्ये महिन्यात गोव्यात खर्चिक बायोबबलच्या सुरक्षा कवचात इंडियन सुपर लिग (आयएसल) फुटबॉल विना प्रेक्षक सुरु झाले. त्यामुळेच स्थानिक खेळाचा हंगाम कधी सुरु होणार याचीच चिंता लागून राहिली होती. 

जानेवारीच्या मध्याला राज्यशासनाने क्रीडा स्पर्धा भरवण्यास परवानगी दिली. पण शैक्षणिक वर्षच विस्कळीत झाल्याने शासकीय शालेय, विद्यापीठ स्पर्धांचे लॉकडाउन कायम राहिले. साहजिकच केवळ राष्ट्रिय संघटनांच्या स्पर्धांचीच खेळाडूंना आशा शिल्लक होत्या. कोल्हापूर जिल्हा संघटनेतर्फे महागाव (ता. गडहिंग्लज) येथे केदारी रेडेकर फौंडेशनने गेल्या आठवड्यात जिल्हा अजिंक्‍यपद निवड चाचणी स्पर्धेत 62 संघांनी सहभाग घेतला. यातून निवडलेल्या खेळाडूंचा संघ जळगावला राज्य स्पर्धेत सहभागी होणार होता. संघ सहभागी झाला असता, तर अधिक खेळाडूंना संधी मिळाली असती. आता स्पर्धाच रद्द झाल्याने फटका खेळाडूंना बसणार आहे. मुख्यतः वयोगटातील खेळाडूंची सुवर्णसंधी हुकणार आहे. 

निराश झालो 
यदा कोरोनामुळे वयोगटातील खेळाडूंचे खुपच नुकसान झाले. या हंगामातील जिल्हा निवड चाचणीत मेहनतीने खेळलो. पंरतु, राज्य स्पर्धा रद्द झाल्याने जिल्हा संघातून चमकण्याची संधी हूकल्याने निराश झालो आहे. 
- अभिजित सुतार, कबडडीपटू, महागाव 

चाचणीसाठी प्रत्येक जिल्हातून केवळ 3-4 खेळाडू 
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य अंजिक्‍यपद कुमार स्पर्धा नाईलाजाने रद्द झाली आहे. तेलंगणाला राष्ट्रीय स्पर्धा असल्याने राज्याचा संघ निवडण्यासाठी केवळ निवडचाचणी होणार आहे. प्रत्येक जिल्हातून 3-4 खेळाडू चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहेत. 
- रमेश भेंडगिरी, कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT