कोल्हापूर

जिल्ह्यातील 19 तपासणी नाक्‍यांवर कडक तपासणी

प्रतिनिधी

कोल्हापूर  : जिल्ह्यात 19 तपासणी नाके आहेत. या नाक्‍यांवर काटेकोर तपासणी करण्यात यावी. विशेषत: मालवाहतूक वाहनांमध्ये तिघांशिवाय अन्य कोणी असता कामा नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी सक्तीने मास्कचा वापर करण्याबाबतही यंत्रणांना आदेश दिले. 
श्री. देसाई म्हणाले, ""वाहतूकदार संघटनेची बैठक घेऊन मालवाहतूक वाहनांमधील चालक, वाहक यांना मास्क पुरवठा करणे तसेच सॅनिटायझर देण्यासह इतर खबरदारी घेण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश दिले. यावेळी त्यांनी प्रभाग समिती, स्वयंसेवक यांची मदत घेऊन सीमा बंदीचे कडक नियंत्रण करण्यासह विशेषत: झोपडपट्टी परिसरात याबाबत दक्ष राहण्याची सूचना केली. अद्यापही दुचाकीवरून डबल सीट प्रवास होत आहे, त्याकडे लक्ष देण्याबाबत सुचवत सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे व क्षेत्रीय पोलिसांचे त्यांनी केलेल्या सेवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील व शहरातील जनतेने आतापर्यंत दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभारही मानले. 

झोपडपट्टींवर लक्ष केंद्रित करा ः डॉ. कलशेट्टी 
शहरातील झोनबंदी यशस्वी करूया. लक्ष्मीपुरीत विक्रेत्यांमध्ये 30 फुटांचे अंतर नसल्यास कारवाई करा, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेतच भाजी विक्री आणि खरेदी करता येईल. 44 झोपडपट्टींच्या ठिकाणी महापालिकेचा 1-1 अधिकारी दिला आहे. अशा झोपडपट्टींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे. अग्निशमन विभागाच्या पथकालाही पाठवत आहे. मे महिन्यातील वाढणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आत्ताच नियोजन करावे, असेही ते म्हणाले. 

नाक्‍यावर आरोग्य तपासणी ः डॉ. देशमुख 
पास घेऊन येणारे वैद्यकीय आणि शासकीय अधिकारी आणि मालवाहतूक अशा तीन जणांना तपासणी नाक्‍यावरून प्रवेश देण्यात येत आहे, असे सांगून पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ""ट्रकचालक आणि त्या सोबतच्या दोन व्यक्ती यांची तपासणी नाक्‍यावर थर्मल स्कॅनव्दारेही तपासणी करणे आवश्‍यक आहे. अशा लोकांपासून जिल्ह्यात संसर्ग येण्याची शक्‍यता आहे. रमजानच्या काळात नमाज पठणासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षताही घ्यावी. झोपडपट्टी भागातही लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी पेट्रोलिंगवर भर द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

रस्ते खोदून प्रवेश बंदी नको ः अमन मित्तल 
काही गावांमध्ये रस्ते खोदून चर काढून कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल म्हणाले, ""गावबंदी करताना अत्यावश्‍यक सेवेसाठी अडचण निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने योजना करावी. प्रमुख शहरांमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हींचा प्रभावी वापर करून पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. आवश्‍यक त्या ठिकाणी ड्रोनचाही वापर करावा. वैयक्तिक अंतर, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन याची प्रभावी अंमलबजावणी करा, तरच होणाऱ्या प्रादुर्भावास आपण रोखू शकू.''  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT