Student Growth Slows For 11th Science Branch This Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

अकरावी विज्ञान शाखेसाठी यंदा दहाच विद्यार्थ्यांची वाढ, मुदतवाढीनंतर पार झाला गतवर्षीचा आकडा

अवधूत पाटील

गडहिंग्लज : यंदा दहावीचा निकाल उच्चांकी लागला. गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, प्रत्यक्षात रडतखडत गतवर्षीच्या प्रवेशाचा आकडा पार केला आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून गतवर्षीच्या तुलनेत दहाच प्रवेश अधिक झाले आहेत. विशेष म्हणजे पाच दिवसांची मुदतवाढ देऊनही यंदा 1093 प्रवेश अर्ज आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अन्य विद्या शाखांचे पर्याय निवडल्याचे स्पष्ट होत आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा 18 ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 10 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रवेशाने कसातरी गतवर्षीचा आकडा गाठला आहे. गतवर्षी 1083 प्रवेश झाले होते. यंदा त्यामध्ये दहाचीच भर पडली आहे. 

विशेष म्हणजे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 25 ऑगस्टपर्यंत होती. त्यामध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली. या पाच दिवसात 113 प्रवेश वाढले आहेत. त्यामुळे हा आकडा 1093 वर पोचला. दरम्यान, यंदा दोन नवी महाविद्यालये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाली आहेत. त्यामुळे मूळ प्रवेश क्षमता 120 ने वाढली आहे. पण, गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशात फारशी वाढ झालेली नाही. सहाजिकच त्याचा परिणाम रिक्त जागांची संख्या वाढण्यावर झाला आहे. 

खेळाडूसाठी मुदतवाढ... 
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील सहभागी खेळाडूंना आरक्षण होते. पण, 26 ऑगस्टला नवा शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार विभागीय व राज्य पातळीवरील स्पर्धांत पहिल्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. केवळ त्यांच्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविली असल्याचे अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश समितीतर्फे कळविले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : - देशभक्तीचा व्यापार केला जातोय- उद्धव ठाकरे

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT