success in rescue ox kolhapur gaganbawda 
कोल्हापूर

आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश 

पंडित सावंत

असळज : गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेला बैल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात अखेर यश आले.  


याबाबत अधिक माहिती अशी, गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या  विहीरीत येथीलच सचिन गावडे यांचा बैल गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. उन्हाळ्यामुळे या विहिरीत पाणी कमी होते. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहीली आणि या बैलाला बाहेर काढण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. मात्र विहीर अत्यंत अरूंद असल्याने बैलाला बाहेर काढण्यात मर्यादा येवू लागल्या. याबाबतची माहिती  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीम  गगनबावडा येथे दाखल झाली. विहिरीतील पाणी बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने या बैलाला विहीरीतून मध्यरात्री तीन वाजण्याच्या  सुमारास बाहेर काढण्यात यश आले. लाइटच्या प्रकाशात तब्बल आठ तास बैलाचा जीव वाचविण्यासाठी चाललेली धडपड अखेर सार्थकी लागली. 


 यावेळी रेस्क्यू टीमसह गुरुनाथ कांबळे, उपसरपंच मुस्ताक वडगावे व येथील युवकांनी परिश्रम घेतले. हा बैल किरकोळ जखमी झाला आहे. एका मुक्या जिवाला वाचविण्यासाठी गगनबावडा येथील युवकांनी केलेली धडपड त्या बैलाला जीवदान देणारी ठरली.   


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT