Successful Lingana climb of climbers
Successful Lingana climb of climbers 
कोल्हापूर

गिर्यारोहकांची यशस्वी लिंगाणा चढाई; १५ वर्षांच्या अथर्वकडून मोहीम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी लिंगाणा सुळक्‍याची यशस्वी चढाई नुकतीच केली. बारावर्षीय कार्तिक कवतिके, मलय मुजावर, पंधरावर्षीय अथर्व कवतिके यांनीही मोहीम पूर्ण केली. मोहिमेत २५ जणांनी सहभाग घेतला.

स्वराज्याची राजधानी रायगड व तोरणागड यांच्यात तीन हजार १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अति दुर्गम असा हा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा. २० नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता हिल रायडर्सच्या बसमधून १२ वर्षांचे कार्तिक कवतिके, मलय मुजावर, १५ वर्षांचा अथर्व कवतिके यांच्यासह पंचवीस जणांची टीम मोहरीकडे मार्गस्थ झाली. पहाटे तीनच्या सुमारास सर्व टीम मोहरी येथे पोचली. पहाटेची थोडी विश्रांती घेऊन दिवस उजाडता गिर्यारोहण, वैयक्तिक व जेवणाचे साहित्य पाठीवर घेऊन टीम लिंगाण्याकडे निघाली.

हार्नेस, कॅराबिनर, डीसेंडर, सेल्फ अँकर हे सर्व गिर्यारोहण साहित्य वापरून सर्व टीम चढाईसाठी सज्ज झाली. प्रत्येक पिचला एक अनुभवी गिर्यारोहक चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांना बिले देण्यासाठी आम्ही सेट केला. प्रत्येकाला टॉप बिले पद्धतीने सुरक्षा देऊन, सर्वांनी मुक्त चढाई करत आरोहण करण्याचा आम्ही प्लॅन करण्यात आला. पायपीट संध्याकाळी सहा वाजता मुख्य सुळक्‍याच्या पायथ्याशी येऊन थांबली. चढाईच्या मार्गा जवळील गुहा छोटी होती. 

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता सगळे जण उठून तयारीला लागले. साधारण साडेपाचला चढाईला सुरुवात झाली. पहिल्यांदा शेवटच्या दोन टप्प्याला राहिलेले रोप फिक्‍स करण्यासाठी मुख्य गिर्यारोहकांच्या टीमने चढाईस सुरुवात केली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गिर्यारोहकांनीही आरोहनास सुरवात केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास बारा वर्षाच्या कार्तिकने सर्वप्रथम लिंगाण्याचा माथा गाठला आणि त्यापाठोपाठ सर्व टीमने लिंगाण्यावर यशस्वी चढाई केली. 

ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, प्रमोद पाटील, महिबूब मुजावर, ऋषीकेश केसकर यांनी मोहिमेस मार्गदर्शन केले.

यांचा सहभाग
विनायक कालेकर, अनिकेत जुगदार आणि मयूर लवटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यानंद बेडेकर, राहुल कदम, अभय मोरे, प्रदीप कवतिके, कार्तिक कवतिके, अथर्व कवतिके, मलय मुजावर, राणोजी पाटील, जयदीप जाधव, अजिंक्‍य गिरमल, स्नेहल रेळेकर, पंढरीनाथ जाधव, अवधूत पाटील, मनोज सातपुते, हर्षवर्धन साळोखे, प्रसाद आडनाईक, हर्षवर्धन चौगुले, मकरंद लवटे, स्वप्नील लवटे, कौस्तुभ लवटे, राजेश माने, नीतेश सातार्डेकर, महेश भंडारे, अनिकेत महाजन, सतीश यादव हे समीट ॲडव्हेंचर, हिल रायडर्स अॅण्ड हायकर्स, मलय ॲडव्हेंचर, वेस्टर्न माउंटन स्पोर्टस, ॲडव्हेंचर गियर, व्हरटाईस ॲडव्हेंचर, कोल्हापूर माऊंटेनियरिंग अॅण्ड ॲडव्हेंचर फाउंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT