kolhapur sakal
कोल्हापूर

शॉक व्हेव लिथोट्रिप्सीव्दारे हृदय उपचार यशस्वी

डॉ.अक्षय बाफनांची माहिती; डायमंडमध्ये झाले उपचार

अर्चना बनगे

कोल्हापूर : ज्या रूग्णांना बायपास(Bypass) करता येणे अशक्य आहे किंवा ज्यांना थकवा (weariness) जास्त जाणवतो. अशा रूग्णांना पर्यायी मार्गाने हृदयउपचाराची (Heart) आधुनिक पध्दत कोल्हापूरात आली आहे. शॉक व्हेव लिथोट्रिस्‍पी (lithotripsy) या तंत्रज्ञानाच्या आधारे हृदयविकार दूर करता येणे शक्य झाले आहे. ही पध्दती बायपासला यशस्वी पर्याय ठरली आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ६१ वर्षीय व्यक्तीवर हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफाना यांनीही शस्त्रक्रीया यशस्वी केली. येथील डायमंड हॉस्पीटल मधील रूग्णावर तंत्र वापरण्यात आले. अशी माहिती डॉ. बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरात गंभीर हृद्यविकाराच्या पाच लाखाहून अधिक रूग्णांवर अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. यात ७० वर्षावरील ९० टक्के पुरूष व ६७ टक्के महिलावर कॉरोनरी आर्टरी (धमन्यामध्ये) ब्लॉकेज झाल्याचे दिसते. ते कॅल्सियमचे असतात.

यात गुंतागुंती असल्यास बायपास सर्जरी केली जाते. मात्र अनेक रूग्ण असे असतात की त्यांना बायपास करणेही अशक्य असते किंवा त्यांना भिती वाटत असते अशा रूग्णांसाठी इनटव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी किंवा शॉक व्हेव लिथोट्रिप्सी तंत्रज्ञान पर्याय म्हणून वापरता येते. डायमंड हॉस्पीटल मध्ये ६१ वर्षीय रूग्णाला बायपास करायचे नव्हते त्यांनी बायपास एवजी या नव्या तंत्रज्ञाना आधारे उपचार करण्यास मान्यता दिली त्यानुसार डॉ. बाफना यांनी हे नवे तंत्र वापरून हृदयउपचार यशस्वी केले आहेत.

ध्वनीवर आधारीत हे तंत्रज्ञान आहे. शॉक व्हेव्ह लिथोट्रिप्सीत अडथळे असलेल्या धमन्यामध्ये एक विशिष्ठ फुगा ठेवला जातो. त्यानंतर डॉक्टर कन्सोल या उपकरणाव्दारे शॉक व्हेव उत्सर्जित करतात त्यामुळे कडक झालेल्या धमन्यातील अडथळे फुटतो त्यानंतर नेहमीच्या अॅन्जिओप्लास्टी प्रक्रियेव्दारे स्टेट बसविण्यात येते ही उपचार प्रक्रिया सुरक्षित व बायपासला पर्याय म्हणून प्रगत शहरात वापरली जाते.

हेच तंत्रज्ञान डायमंड मधील त्या रूग्णाला वापरले गेले असून या रूग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती डॉ. बाफना यांनी दिली. रूग्णांचे वय जात असेल किंवा मधूमेह असेल अशा रूग्णाच्या धमन्यातील अडथळे अधिक कठीण झालेले असल्यास ते काढणे हे आव्हानात्मक काम असते. कडक झालेल्या अडथळ्यामुळे बलून थेरपि करणे कठीणे होते. तेव्हा बायपासचा पर्याय वापरला जातो मात्र बायपास ही नको असल्यास शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी याचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT