sugarcane ignited  farmer angry murgud case
sugarcane ignited farmer angry murgud case 
कोल्हापूर

शेतकरी संतप्त: पेटलेला ऊस टाकला पालिकेसमोरच

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड (कोल्हापूर) : येथील वेदगंगा नदीला लागून असलेल्या दत्तमंदिराजवळील जवळपास तीस एकरांतील उसाला आग लागली. यात शेतकऱ्यांचे चाळीस लाखांचे नुकसान झाले. सूरज मधुकर मोरबाळे यांच्या सात एकर उसासह ठिबक सिंचनची लाखो रुपयांची पाईप खाक झाली. दरम्यान, ऊस जळाला असताना नगरपरिषदेने वेगवेगळी कारणे सांगत बंब न पाठवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या दालनाबाहेर जळालेला ऊस टाकला.

नदीजवळ सुरज मधूकर मोरबाळे, संतोष सर्जेराव दबडे, धोंडिराम शंकर सुतार, सुहास पांडुरंग दरेकर, शशिकांत चौगले, श्रीकांत चौगले, विलास चौगले, बापूसो चौगले, दिलीप चौगले, अभिषेक चौगले यांच्यासह चेतन मोहिते यांची ऊसशेती आहे. दुपारी दोनच्या दरम्यान सूरज मोरबाळे यांच्या उसाला आग लागली. आणि बघता बघता आगीने चौगले पाणंद परीसरातील जवळपास तीस एकर ऊस कवेत घेतला. कागल नगर परिषद, बिद्री व हमिदवाडा कारखान्याचे बंब पाचारण केले, तसेच सचिन मेंडके यांनी पाण्याचे टॅंकर दिले.


दरम्यान, नगरपरिषदेने बंब पाठवून दिला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या दालनाबाहेर जळालेला ऊस टाकला. वेगवेगळी कारणे देऊन नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांसह एकही नगरसेवक, नगरसेविका उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकरी जास्तच आक्रमक झाले. त्यांनी या वेळी ढीम्म प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत मुख्याधिकारी येत नाहीत, तोपर्यंत ऊस काढू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. मुरगूड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. संतोष वंडकर, दगडू शेणवी, पै. प्रकाश चौगले, गुरुदेव सूर्यवंशी, संदीप भारमल, सुरज मोरबाळे, दिग्विजय चव्हाण आदींसह नुकसाग्रस्त शेतकरी उपस्थित होते.


उसाला लगेच तोड
जळालेला ऊस तत्काळ टोळ्या पाठवून देऊन युद्ध पातळीवर तोडून नेण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याने संताजी घोरपडे कारखान्याच्या चार टोळ्या दाखल झाल्या आहेत.

यापूर्वी पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या तत्काळ सेवा दिल्या आहेत; मात्र १५ दिवसांपासून बंबाचे इंजिन बंद आहे. त्याची बांधणी सोलापूरमध्ये केली होती. याची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये पर्यायी गाडी ठेवणार आहे.
संजय गायकवाड, मुख्याधिकारी

संपादन अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT