support to candidate lok sabha Congress NCP satej patil ask question of India alliance in Ichalkaranji
support to candidate lok sabha Congress NCP satej patil ask question of India alliance in Ichalkaranji  Sakal
कोल्हापूर

Kolhapur News : काँग्रेस, राष्ट्रवादीची फरफट कशासाठी? इचलकरंजीतील इंडिया आघाडीचा सवाल

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : एखाद्या उमेदवाराला केवळ शिवसेनेचाच पाठिंबा हवा असेल तर त्या मागे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने त्या उमेदवाराच्या पाठीमागे का फरफरत जावे, असा संतप्त सवाल इचलकरंजीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिका-यांनी आमदार सतेज पाटील यांना केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून फक्त शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया तथा महाविकास आघाडीकडून शेट्टी यांच्या संभाव्य उमेदवारीला इचलकरंजीतून उघडपणे विरोध केला आहे.

याबाबत शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. हातकणंगले लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधान सभा मतदार संघातील आढावा घ्यावा, तसेच इंडिया आघाडीची राजकीय ताकद घेवून स्वतंत्र उमेदवार द्यावा,

अशी मागणीही यावेळी आमदार पाटील यांच्याकडे करण्यात आली. याबाबत आपण वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या कानावर ही बाब घालून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तथापि, इंडिया आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. त्यामध्ये उमेदवारीबाबत सुरु असलेल्या घडामोडीचा आढावा घेतला होता. तर उमेदवारीबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी आमदार पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार त्यांची भेट घेवून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सद्यस्थीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यमान खासदारांची सद्यस्थीती व निवडूकीतील इच्छुक उमेदवारांची नावे याबाबत ऊहापोह करण्यात आला. इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची कितपत शक्यता यावरही यावेळी विचारमंथन करण्यात आले.

शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, शिवसेनेचे सयाजी चव्हाण, महादेव गौड, संभाजी नाईक, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, राजू आलासे, रविराज पाटील, रवी वासुदेव, नितीन जांभळे, संभाजी सुर्यवंशी, सदा मलाबादे आदी उपस्थीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT