Surgery On The Dhaman Snake In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमध्ये चक्क धामण सापावर शस्त्रक्रिया

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : शहरातील केडीसी कॉलनीतील बिरंजे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये सापडलेल्या जखमी धामण सापाला ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनच्या (एआरए) प्राणी मित्रांनी जीवदान दिले. या जखमी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करून कृमी बाहेर काढण्यात आल्या. यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. 

या अपार्टमेंटमधील रहिवासी संतोष बेगडा यांना बेसमेंटमध्ये साप दिसला. त्यांनी तत्काळ असोसिएशनचे प्राणीमित्र हेमंत तोडकर यांना माहिती दिली. तोडकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अडचणीतून सापाला पकडले. या वेळी साप जखमी व आजारी असल्याचे तोडकरांच्या लक्षात आले. वनविभागाला कळवून सापाला पशुवैद्यकीय अधिकारी वरुण धूप यांच्याकडे नेले. धामणला डाव्या बाजूच्या जबड्याला जखम होती.

तसेच पोटाकडील बाजूस सूज होती. ही सूज का आली असेल म्हणून इस्लामपूरचे ए. आर. ए. संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. सूज आलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली असता तेथे भरपूर प्रमाणात कृमी आढळल्या. या कृमी सापाच्या शरीरातून पोषक मूल्य शोषून घेत असल्याने सापाची वाढ खुंटते. डॉ. धूप यांनी शस्त्रक्रिया करून या सर्व कृमी बाहेर काढल्या. या सापावर डॉ. धूप यांनी मोफत उपचार केले. पक्षी, बेडूक, सरडा, उंदीर हे धामणचे खाद्य असते. आठवड्यात तो तीन ते चार उंदीर खातो. म्हणून त्याला शेतकऱ्यांचा मित्र संबोधतात, असे तोडकर यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे सदस्य निखिल पाटील, सुशील असोदे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT