Suspected Patient Of Sari, Eli Found In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Suspected Patient Of Sari, Eli Found In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत आढळले सारी, ईलीचे संशयित रुग्ण

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत शहरात 45 टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. यात सारी, ईली आणि कोरोना अशा आजाराचे 72 संशयित रुग्ण आढळले आहेत. यातील आठ संशयितांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, संशयित रुग्णांना तातडीने उपचार घेण्याबाबत यंत्रणा गतिमान केली आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही धडक मोहीम राबवली आहे. त्यानुसार इचलकरंजीतही 421 जणांचे सर्व्हेसाठी पथक तयार केले आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 50 पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. काही ठिकाणी स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात येत आहे. तीन- चार दिवसांपासून शहरातील विविध भागांत सर्व्हे करण्यात येत आहे. यात विविध लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. अशा रुग्णांची तातडीने तपासणी करण्याबाबत यंत्रणा गतिमान झाली. 

शहरात असलेल्या विविध सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत एक लाख 28 हजार नागरिकांचा सर्व्हे केला आहे. म्हणजे सुमारे 45 टक्के सर्व्हे पूर्ण झाला. यात आतापर्यंत कोरोना, ईली व सारी आजाराचे 72 रुग्ण आढळून आले आहेत. या आजारांची लक्षणे साधारणपणे एकसारखीच आहेत. हे आजार संसर्गजन्य असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. 

या सर्व संशयितांच्या कोविडची तपासणी केली आहे. त्यातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुढील तीन- चार दिवस हा सर्व्हे चालणार आहे. त्यानंतर एकूण स्थिती पुढे येण्यास मदत होईल. मात्र, सारी आणि ईली या आजाराचे संशयित रुग्ण सर्व्हेमध्ये आढळून आल्याने नवा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली. 

नवे 12 रुग्ण 
शहरात आज नव्या 12 रुग्णांची नोंद पालिका प्रशासनाकडे झाली आहे. यात सांगली नाका परिसरात सहा रुग्ण सापडले आहेत. इंदिरा हौसिंग सोसायटी, विक्रमनगर, दाते मळा, सहकारनगर, राममंदिर (नदीवेस), सर्वोदयनगर या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला. सध्या शहरात 392 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

संपादन - सचिन चराटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT