swimming for two boys in rajaram bandhara kasaba bawada one dead and one live during swimming in kolhapur
swimming for two boys in rajaram bandhara kasaba bawada one dead and one live during swimming in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरून मुलगा गेला वाहून ; सुदैवाने दुसरा वाचला

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा (कोल्हापूर) : येथील राजाराम बंधाऱ्या वरून कदमवाडी येथील पंधरा वर्षाचा मुलगा वाहून गेला. संस्कार कुरणे असे त्याचे नाव आहे. त्याचा सहकारी नजीद शेख याला वाचवण्यात यश आले आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

घडलेली घटना अशी, कदमवाडी शिवराय कॉलनी येथील दोघेजण खेळायला जातो असे सांगुन गेली काही दिवस पोहायला येत आहेत. संबंधित मुलगा आपल्या मित्रासोबत नदीवर पोहोण्यासाठी आला होता. बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडे आहेत, त्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह वाहतो. बंधाऱ्यावरील पश्चिम बाजूला आंघोळ करत असताना हा मुलगा दरवाजा जवळ गेला असता पाण्याच्या प्रवाहातून तो वाहून गेला. तेथे उपस्थित जितु केंबळे यांनी नजीद शेख याला बाहेर काढले. मात्र संस्कार कुरणेला वाचवता आले नाही. राजाराम बंधारा ग्रुपलमधील हनमंत सुर्यवंशी, रावसाहेब शिंदे, संतोष गायकवाड यांना शर्तीचे प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.  

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT