कोल्हापूर

Tauktae Cyclone Effect : आजर्‍यात हिरण्यकेशी पात्राबाहेर; शेतीसह कृषी पंपांचे नुकसान

अतिवृष्टीचा फटका; गावांतील घरांची पडझड

रणजित कालेकर

आजरा : चक्रीवादळामुळे (cyclone) रविवार (१६) तालुक्यात मुसळधार (heavy rain) पाऊस झाला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिरण्यकेशी नदी (hirnyakeshi river) पात्राबाहेर पडली आहे. शेतामध्ये पाणी घुसल्याने बांधाचे व ऊसासह नदीकाठावरील कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे (farmers) नुकसान झाले आहे. काही गावांत घरांची पडझड झाली आहे.

चक्रीवादळाचा फटका तालुक्यांत बसला आहे. रविवारी दिवसभर व रात्री पावसाची संततधार सुरू होती. तालुक्यात सरासरी ११४.५० मिलीमीटर पाऊस झाला. आजरा येथील पर्जन्यमापन केंद्रांवर १४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे माहेरघर असणारे किटवडे येथे सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. किटवडे बंधाऱ्याला बरगे टाकून पाणी अडवल्यामुळे पावसाचे पाणी पात्राबाहेर पडले आणि शेतामध्ये घुसले. परिणामी शेतीचे बांध पडले असून कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत.

पेरणोली येथेही नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. ८० कृषिपंपांचे नुकसान झाले आहे. नदीकाठीवरील बहुतांश गावात अशीच परिस्थिती आहे. आज दुपारनंतर पाणी ओसरायला सुरूवात झाली असून पाण्यात अडकलेले कृषिपंप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. काही गावांत घरांची पडझडही झाली आहे. वादळी पावसामुळे घरावरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, कोसळणे असे घटनाही घडल्या आहेत.

साळगाव येथे मनोहर पाटील यांच्या घराची भिंत अनिल तरवडेकर यांच्या घरावर पडून २० हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उचंगी पैकी हुडा येथील संभाजी देसाई यांच्या पोल्ट्री शेडचे भिंत कोसळली. शेडवरील पत्रे उडाले आहेत. त्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रामतीर्थ धबधबा प्रवाहित

हिरण्येकेशीला पाणी आल्याने आज दिवसभर रामतीर्थ धबधबा कोसळत होता. त्यामुळे पावसाळ्यातील चित्र अनुभवयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT