Tell me, how do we live? 
कोल्हापूर

सांगा, आम्ही जगायचे कसे ? 

सकाळवृत्तसेवा

दानोळी  : शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यातील चांदोली अभयारण्यग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रत्येकजण आपल्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. लवकर मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून आंदोलन सुरू असून याचे नेतृत्व डॉ. भारत पाटणकर करत आहेत. 

आमच्या शेतजमिनी घेतल्या त्याच्या बदल्यात पर्यायी जमीन दिली नाही. ज्यांना दिली त्यांना पाण्याची सोय नाही, घेतलेल्या जमिनीच्या 65 टक्के रकमेवरील व्याज निर्वाह भत्ता 2016 पासून दिलेला नाही, घर बांधणी अनुदान दिलेले नाही, अनेकवेळा चर्चा करूनही ही देणी दिलेली नाही, कोरोनामुळे रोजगारही गेले आहेत. तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. 

1 जून पासून मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून पाचव्या दिवसानंतर एक वेळचे जेवण, सहाव्या दिवशी दोन वेळचे जेवण बंद करणार असून सातव्या दिवसापासून आपल्याच घरासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यातील 100 कुटुंब या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, दानोळीतील धरणग्रस्त वसाहतीतील आंदोलनाला सरपंच सुजाता शिंदे, शिरोळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, तलाठी एस. डी. कुईगडे, कोतवाल अकबर मुलाणी यांनी भेट दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT